Happy Krishna Janmashtami : श्रावण महिना सण-उत्सव आणि व्रत-वैकल्याचा महिना मानला जातो. श्रावण महिन्याचा चौथा सोमवार २६ ऑगस्ट रोजी असून, याच दिवशी भगवान श्रीकृष्णाची जयंतीही साजरी होणार आहे.
श्रीकृष्णाची विविध रूपे प्रेरणादायी आहेत. द्वापर युगात श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला भगवान विष्णूंनी श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला होता. या वेळी जन्माष्टमीला सोमवार आणि रोहिणी नक्षत्राच्या संयोगामुळे सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. शुभ योग-संयोगात जन्माष्टमीचा दिवस साजरा होईल.
श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला असे मानले जाते. मध्य प्रदेशात आणि उत्तर भारताच्या बऱ्याचशा भागात पौर्णिमान्त महिना असलेले पंचांग वापरात असल्याने या दिवशी तेथे भाद्रपद कृष्ण अष्टमी येते. दरवर्षी या तिथीबाबत संभ्रम निर्माण होऊन जन्माष्टमी दोन दिवस साजरी केली जाते. पहिल्या दिवशी श्रीकृष्ण जयंती साजरी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडून गोकुळाष्टमी साजरी करतात.
श्रीकृष्ण जयंतीला पाळणा सजवून त्यात बाळकृष्णाला टाकतात, यादिवशी बाळकृष्णासाठी ५६ भोगचा नैवेद्यही करतात. असा हा जन्माष्टमी म्हणजेच श्रीकृष्ण जयंती उत्सवाचा हा आनंद द्विगुणीत करण्यासाठी हे शुभेच्छा संदेश पाठवून ही जन्माष्टमी साजरी करा.
हाथी घोडा पालखी…
जय कन्हैया लालकी,
कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा
…
कृष्ण मुरारी नटखट भारी
माखनचोर जन्मला
रोहिनी नक्षत्राला
देवकी नंदाघरी
बाळ तान्हे तेजस्वी
मोहूनी घेती
सर्व मिळूनी पाळणा गाती
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
…
ही-दूध-लोणी आहे ज्याचा छंद,
तो आमचा लाडका श्रीकृष्ण ,
सगळ्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा
…
दही हंडी, गोकुळाष्टमी, जन्माष्टमी
नाव अनेक पण उत्साह तोच
जन्माष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा
…
अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं,
राम नारायणं जानकी वल्लभं,
जन्माष्टमीच्या शुभेच्छा!
…
राधाचं प्रेम, बासरीचा गोड नाद
लोण्याचा स्वाद, गोपींसोबतची रास
असा आहे श्रीकृष्ण खास
जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा
…
कृष्णाचं प्रेम, कृष्णाची महिमा
कृष्णाची श्रद्धा, कृष्णामुळे आहे संसार
तुम्हा सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
…
रुप मोठे प्रेमळ आहे,
चेहरा त्याचा निराळा आहे,
सर्वात मोठ्या समस्येला,
श्रीकृष्णाने सहज मात दिली आहे
जन्माष्टमीच्या मनःपू्र्व शुभेच्छा
…
मुरली मनोहर, ब्रिजचे कर्ताधर्ता
ते आहेत नंदलालचे गोपाला
बासरीच्या मोहक आवाजाने सर्व दुःख हरणारा
मुरली मनोहरचा सण गोविंदा गोपाळा
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
…