Janmashtami : जन्माष्टमीच्या रात्री धन-लाभासाठी करा हे ४ उपाय; मिळेल नुसता पैसा, होईल बक्कळ लाभ
मराठी बातम्या  /  धर्म  /  Janmashtami : जन्माष्टमीच्या रात्री धन-लाभासाठी करा हे ४ उपाय; मिळेल नुसता पैसा, होईल बक्कळ लाभ

Janmashtami : जन्माष्टमीच्या रात्री धन-लाभासाठी करा हे ४ उपाय; मिळेल नुसता पैसा, होईल बक्कळ लाभ

Published Aug 24, 2024 03:03 PM IST

Krishna janmashtami Upay 2024 : भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी जन्माष्टमीच्या दिवशी करावयाचे काही उपाय शास्त्रात सांगितले आहेत. असे मानले जाते की, या उपायांचे पालन केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळते आणि जीवनात आनंद मिळतो.

जन्माष्टमी उपाय
जन्माष्टमी उपाय

Krishna Janmashtami Upay 2024 : श्रीकृष्णाची विविध रूपे प्रेरणादायी आहेत. द्वापर युगात श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला भगवान विष्णूंनी श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला होता. या वेळी २६ ऑगस्ट २०२४ रोजी जन्माष्टमी असून, हा चौथा श्रावण सोमवार आहे. 

श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाचे बालस्वरूप असलेल्या बाळकृष्णाची पूजा केली जाते. या दिवशी लोक देवघराला सजवतात तसेच बाळकृष्णाचाही आकर्षक असा श्रृंगार करतात आणि बाळकृष्णासाठी पाळणा सजवतात. हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात मध्यरात्री झाला होता. यामुळे मध्यरात्री बाळकृष्णाचा जन्मसोहळा साजरा करतात, तसेच बाळकृष्णाला पंचामृताने स्नान देखील घालतात. श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारचे पदार्थ म्हणजेच ५६ भोगचा नैवेद्य तयार करून त्याला सजवलेल्या पाळण्यात टाकले जाते. 

जन्माष्टमीच्या दिवशी करावयाचे काही उपाय ज्योतिष शास्त्रात सांगितले आहेत, जे केल्याने माणसाच्या मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुख-संपत्ती येते. जाणून घ्या कृष्ण जन्माष्टमीला कोणते उपाय करावेत-

बाळकृष्णाला बासरी अर्पण करा - 

भगवान श्रीकृष्णाला बासरी खूप आवडते. त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला चांदीची बासरी अर्पण करावी. यासोबतच 'कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्माने। 'प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः' या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. असे मानले जाते की असे केल्याने जीवनातील सर्व दुःखे दूर होतात आणि संपत्ती येते.

विड्याची पाने अर्पण करा - 

अनेक प्रयत्न करूनही आर्थिक स्थिती सुधारत नसेल तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला विड्याची पाने अर्पण करावी. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी त्या पानावर कुंकूने श्रीयंत्र लिहून पैशाच्या जागी ठेवावे. असे केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळते असे मानले जाते.

शंखाने अभिषेक- 

जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाचा शंखाने अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारते असे मानले जाते. घरात आर्थिक सुबत्ता येते.

लोणी आणि खडीसाखरचा नैवेद्य - 

जन्माष्टमीच्या मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाला लोणी आणि खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करावा. भगवान श्रीकृष्णाला लोणी आणि खडीसाखर खूप आवडते. असे केल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि संपत्ती येते, असे मानले जाते.

टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner