Shri Krishna Jayanti : जन्माष्टमी कधी आहे? जाणून घ्या पूजेचा योग्य मुहूर्त आणि पूजा-विधी-shri krishna jayanti 2024 date janmashtami pujan muhurta and puja vidhi ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Shri Krishna Jayanti : जन्माष्टमी कधी आहे? जाणून घ्या पूजेचा योग्य मुहूर्त आणि पूजा-विधी

Shri Krishna Jayanti : जन्माष्टमी कधी आहे? जाणून घ्या पूजेचा योग्य मुहूर्त आणि पूजा-विधी

Aug 21, 2024 04:41 PM IST

Krishna Janmashtami 2024 : यंदा श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमीचा आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे. असे मानले जाते की कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी लहान मुलाप्रमाणे बाळकृष्णाचा हा जन्मोत्सव साजरा करण्यात येतो, यामुळे सुख आणि सौभाग्य प्राप्त होते.

श्रीकृष्ण जयंती २०२४
श्रीकृष्ण जयंती २०२४

Krishna Janmashtami 2024 : श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. भगवान श्रीकृष्णाची जन्मतिथी जन्माष्टमी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी अनेक लोक उपवास करतात आणि भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत लीन होतात. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाला पाळणा सजवून त्यात तयारी करून ठेवावे आणि मनोभावे पूजन करावे, यामुळे सुख आणि सौभाग्य प्राप्त होते. कृष्ण जन्माष्टमीची तारीख, पूजा पद्धत, शुभ वेळ आणि कथा जाणून घेऊया-

जन्माष्टमी २०२४ कधी आहे?

अष्टमी तिथी प्रारंभ - २६ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ३ वाजून ३९ मिनिटे.

अष्टमी तिथी समाप्ती - २७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी २ वाजून १९ मिनिटे.

रोहिणी नक्षत्र प्रारंभ - २६ ऑगस्ट २०२४ दुपारी ३ वाजून ५५ मिनिटे.

रोहिणी नक्षत्र समाप्ती - २७ ऑगस्ट २०२४ दुपारी ३ वाजून ३८ मिनिटे.

कृष्ण जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त

पूजा वेळ - २६ ऑगस्ट, पहाटे १२ वाजून ६ मिनिटे ते १२ वाजून ५१ मिनिटे.

पूजा कालावधी - ०० तास ४५ मिनिटे

चंद्रोदय वेळ - रात्री ११ वाजून २० मिनिटे.

यावेळी योगायोग असा आहे की जन्माष्टमी, अष्टमी तिथी एकाच दिवशी असल्याने सर्व संत, तपस्वी आणि गृहस्थ एकाच दिवशी श्रीकृष्णाची भक्तिभावे पूजा करू शकतील. सोमवार, २६ तारखेला पहाटे ३.४० वाजता अष्टमी तिथी सुरू होणार असल्याचे पंचांगाच्या गणितावरून दिसून येत आहे. २६ रोजी पहाटे २:२० वाजता अष्टमी तिथी समाप्त होईल. जन्माष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्र दुपारी ३:५५ वाजता सुरू होईल आणि २७ रोजी दुपारी ३ वाजून ३८ मिनिटापर्यंत राहील.

कृष्ण जन्माष्टमीची पूजा पद्धत

सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. आता देवघर स्वच्छ करा. बाळकृष्णाचा पाळणा सजवा, भगवान श्रीकृष्णाला पंचामृत, गंगाजल आणि कच्च्या दुधाने अभिषेक करा. बाळकृष्णाला स्वच्छ वस्त्राने पुसून कपडे, बांगड्या, कानातले, मुकुट आणि फुलांच्या माळा घाला. श्रीकृष्णाला फुलांनी सजवा. नंतर त्यांना पाळणामध्ये बसवा आणि त्यांना झुलवा. लहान बाळाप्रमाणे बाळकृष्णाची सेवा करा. आता तुपाचा दिवा लावून भगवंताची आरती करा. लोणी आणि साखरेची मिठाई अर्पण करा आणि क्षमा प्रार्थना करा.

श्रीकृष्णाचा जन्म कसा झाला?

द्वापार काळात कंसाचे अत्याचार मर्यादेपलीकडे वाढले तेव्हा आकाशातून आवाज आला की कंसाला त्याची बहीण देवकीच्या आठव्या उदरातून जन्मलेल्या मुलाच्या हातून मरावे लागेल. हे टाळण्यासाठी कंसाने आपली बहीण देवकी आणि मेहुणा वासुदेव यांना कडेकोट बंदोबस्तात तुरुंगात डांबले होते. बहीण देवकीच्या पोटातून रात्री बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्म झाला, हे आठवे बाळ होते. तेव्हा कारागृहातील सर्व रक्षक झोपले होते. मग वासुदेवांनी कंसापासून बाळकृष्णाचे रक्षण करण्यासाठी तुरुंगातून बाहेर पडून मुसळधार पावसात नंदाच्या घरी जाऊन कृष्णाच्या संगोपनाची जबाबदारी दिली आणि त्याच वेळी यशोदेच्या पोटातून पुत्रीचा जन्म झाला. नंदाच्या या पुत्रीला त्यांनी तुरुंगात आणून देवकीजवळ ठेवण्यात आले. असे म्हटले जाते की, श्री कृष्णाचा जन्म गौर जातीच्या घरात झाला असल्याने गौर जातीतील सर्व लोक त्यांना आपले पूजनीय देव मानतात आणि त्यांची पूजा करतात. जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाचे भक्त उपवास आणि पूजा करतात.

 

विभाग