Krishna Janmashtami 2023 : श्रावण कृष्णपक्ष अष्टमीला भगवान कृष्णाचा जन्म झाला होता. त्यामुळं दरवर्षी दिवस श्रीकृष्ण जयंती म्हणून साजरा केला जातो. भगवान कृष्णाचा जन्म ज्या दिवशी झाला तो दिवस म्हणजेच श्रीकृष्ण जयंती, गोकुळाष्टमी किंवा श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. येत्या सहा सप्टेंबरला भारतासह संपूर्ण जगभरात जन्माष्टमीचा सण साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी असंख्य भाविकांनी जोरदार तयारी करण्यास सुरुवात केली आहे. सुख-समृद्धी आणि शांतीसाठी लाखो भाविक श्रीकृष्ण जन्माष्टमीला उपवास ठेवत असतात. याशिवाय जन्माष्टमीला श्रीकृष्णाला खीर, लाडू किंवा श्रीखंड या पदार्थांचं नैवेद्य अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामुळं आता श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या गोष्टी अर्पण करायला हव्यात, जाणून घेऊयात.
दूधापासून तयार होणारं श्रीखंड हे श्रीकृष्णाचं प्रचंड आवडतं खाद्य मानलं जातं. कन्हैयाला नेहमी 'माखनचोर' असंही म्हटलं जातं. त्यामुळं जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला श्रीखंड आणि मिश्री अर्पण केल्यास व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक बदल होण्याची शक्यता असते. याशिवाय धनिया पंजिरी देखील श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय होतं. त्यामुळं या पदार्थाचा नैवेद्य दिल्यास कन्हैया प्रसन्न होण्याची शक्यता असते. खव्यापासून तयार झालेला पेढ्याचा नैवेद्य श्रीकृष्णाला दिल्यास कुटुंबात गोडवा निर्माण होण्यास मदत होत असते. कुरकुरीत घेवर श्रीकृष्णाला अर्पण केल्यास तो भक्तांवर प्रसन्न होतो. त्यामुळं जन्माष्टमीला या गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी.
श्रीकृष्णाची पूजा करताना मोहनाचा नैवेद्य देणंही अत्यंत शुभ आणि फायदेशीर मानलं जातं. त्यामुळं तुमचं आयुष्य वाढण्यास मदत होते. याशिवाय कृष्णाला पंचामृताचा नैवेद्यही द्यायला हवा. देवाला अर्पण केल्यानंतर पंचामृताचं सेवन करायला हवं. तसेच शेजाऱ्यांमध्येही त्याचं वाटप करायला हवं. त्यामुळं प्रत्येकाच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी येण्यास मदत होत असते. तसेच रसगुल्ला, जिलेबी, बुंदी किंवा लाडूंचा नैवेद्य दिल्यानेही श्रीकृष्ण प्रसन्न होण्याची शक्यता असते. अशा प्रकारे तुम्ही आवडत्या पदार्थांचा नैवेद्य देवून भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करून घेऊ शकता. त्यामुळं तुमच्या आणि कुटुंबियांच्या आयुष्यात सकारात्मक बदल पाहायला मिळू शकतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या