मराठी बातम्या  /  religion  /  Ganesh Chaturthi : विनायक चतुर्थीला घरी आणा बाप्पाच्या या लाडक्या गोष्टी
गणपती बाप्पा
गणपती बाप्पा (हिंदुस्तान टाइम्स)

Ganesh Chaturthi : विनायक चतुर्थीला घरी आणा बाप्पाच्या या लाडक्या गोष्टी

24 January 2023, 7:54 ISTDilip Ramchandra Vaze

Shree Ganesh Jayanti 2023 : घरी गणरायांचं आगमन होताना त्यांच्या आवडत्या काही गोष्टी घरात आणल्यास श्रीगणेश प्रसन्न होतील. काही अशा गोष्टी आहेत ज्या घरात आणल्याने आणि त्या गणरायांना अर्पण केल्याने गणपती बाप्पाचा आशिर्वाद मिळतो.

विनायक चतुर्थी २५ जानेवारी २०२३ रोजी भक्तीभावात साजरी केली जाईल. या दिवशी गणरायांचा वाढदिवस असल्याने घरोघरी माघी गणपतीची स्थापना केली जाईल. मात्र घरी गणरायांचं आगमन होताना त्यांच्या आवडत्या काही गोष्टी घरात आणल्यास श्रीगणेश प्रसन्न होतील. काही अशा गोष्टी आहेत ज्या घरात आणल्याने आणि त्या गणरायांना अर्पण केल्याने गणपती बाप्पाचा आशिर्वाद मिळतो. कोणत्या गोष्टी आहेत ज्यांचा पूजेत समावेश करावा...चला पाहूया.

ट्रेंडिंग न्यूज

दुर्वा

श्रीगणरायांना अतिशय प्रिय अशा दुर्वा या दिवशी घरात नक्की आणाव्यात धार्मिक मान्यतेनुसार जो व्यक्ती गणरायांना दुर्वा अर्पण करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात. त्याचं जीवन आनंदाने भरुन जातं. २१ किंवा त्यापेक्षा अधिक दुर्वा गणरायांना अर्पण केल्या जाऊ शकतात.

मोदक

श्रीगणेशांना मोदक अत्यंत प्रिय आहे. मोदक म्हटलं की गणपतीबाप्पा डोळ्यासमोर येतात. गणरायांचं अत्यंत प्रिय खाद्य म्हणून मोदकाकडे पहिलं जातं. सहाजिकच गणरायांना मोदकाचा नैवेद्य दाखवल्यास त्यांची कृपा होते आणि तुमच्या जीवनात आनंदाचा गोडवा दीर्घकाळ टिकूनन राहातो. त्यामुळेच गणरायंना मोदक अर्पण करावे.

हळद-कुंकू

श्रीगणरायंचं आगमन होताना हळदकुंकू गणरायांच्या भाळी लावावे आणि आपल्याही कपाळी लावावे. असं केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात.

तूप

पंचामृतातला एक अत्यंत महत्वाचा प्रकार म्हणजे तूप. सध्या दिवस थंडीचे असल्याने तूपावर खास महत्व दिलं जातं. तूप हे पौष्टीक आणि गुणकारी आहे. गणपती घरी आल्यावर त्यांची पूजा तुपाच्या दिव्याने करावी. असं केल्यास त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

विभाग