श्रावण महिना म्हणजेच श्रावण हा भगवान शंकाराला सर्वात प्रिय आहे. पौराणिक मान्यतेनुसार, श्रावण महिन्यात भगवान शिव पृथ्वीवरील आपल्या सासरच्या घरी येतात आणि भक्तांचे संकट दूर करतात. त्यामुळेच या पवित्र महिन्यात भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी भक्त पूजा आणि जलाभिषेक करतात. हा संपूर्ण महिना मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो. श्रावणामध्ये काय-काय केले जाते ते आपण येथे जाणून घेऊया.
पार्थिव शिवलिंग पूजन -
भोलेनाथांना श्रावणात जल, पंचामृत इत्यादींनी अभिषेक करणे शुभ मानले जाते. या वेळी भगवान शिवाला धातूरा, भांग आणि भस्म या आवडत्या वस्तू अर्पण कराव्यात, यासाठी मातीचे शिवलिंग बनवून त्याची पूजा करणे उत्तम मानले जाते. यामुळे भगवान शिव प्रार्थना लवकर स्विकारतात, अशी मान्यता आहे.
श्रावण सोमवारचे व्रत -
श्रावण सोमवार हा विशेष दिवस मानला जातो. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगला जीवनसाथी मिळावा यासाठी उपवास करतात. यामुळे धन, सुख आणि समृद्धी वाढते आणि सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते.
हिरव्या रंगाचा वापर -
श्रावणतील पावसाळ्यामुळे निसर्गावर हिरवी चादर पसरलेली असते. हिरवा रंग देखील सौभ्यागाचे प्रतीक मानले जाते. श्रावणमध्ये हिरव्या बांगड्या आणि साडी नेसल्याने भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात, असे मानले जाते. तसेच, वैवाहिक जीवनात आनंद येतो आणि गर्भधारणाची इच्छा पूर्ण होते.
कावड यात्रा -
श्रावणात, कंवरियां (शिवभक्त) भोलेनाथाचा आशीर्वाद घेण्यासाठी एक कठीण प्रवास करतात. यामध्ये तो पाण्याने भरलेली कावड खांद्यावर घेऊन हरिद्वार आणि संगम घाटापर्यंत पायी चालत जातात. श्रावण शिवरात्रीला त्या पाण्याने जलाभिषेक करतात. असे केल्याने मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते.
टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या