Shravan Somvar Vrat Vidhi Katha 2024 : श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा विशेष मानला जातो. या दिवशी शिवभक्त उपवास करतात आणि पूजा करतात. असे मानले जाते की, श्रावण सोमवार व्रत आणि पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात. यंदा महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये श्रावण महिना कधी सुरू होत आहे, जाणून घ्या
५ ऑगस्ट २०२४, सोमवारपासून श्रावण महिना सुरू होत आहे. या वर्षी श्रावण सोमवारचा विलक्षण योगायोग श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी घडला आहे. तसेच, मंगळवार ३ सप्टेंबर २०२४ रोजी श्रावण महिना संपेल. या वर्षी भगवान शिवाला अत्यंत प्रिय असलेले एकूण पाच श्रावण सोमवारचे व्रत असतील. जर तुम्ही पहिल्यांदाच श्रावण सोमवारचे व्रत पाळत असाल तर जाणून घ्या श्रावण सोमवारच्या सर्व तारखा आणि या खास गोष्टी-
पहिला श्रावण सोमवार व्रत ५ ऑगस्ट २०२४ रोजी आहे. दुसरा श्रावण सोमवार व्रत १२ ऑगस्ट २०२४ रोजी आहे. तिसरा श्रावण सोमवार व्रत १९ ऑगस्ट २०२४ रोजी आहे. चौथा श्रावण सोमवार व्रत २६ ऑगस्ट २०२४ रोजी आहे. पाचवा श्रावण सोमवार व्रत २ सप्टेंबर २०२४ रोजी आहे.
भगवान शिव आणि माता पार्वतीची मूर्ती, फळे, फुले, मिठाई, दही, पंच रस, गाईचे कच्चे दूध, आंब्याची पाने, दिवा, धूप, कापूर, शुद्ध तूप, पवित्र धागा, मध, गंगाजल, सौभाग्याचे साहित्य, कुंकू, भांग, धतुरा, पंच मेवा आणि दक्षिणा इ.
धार्मिक मान्यतेनुसार श्रावण सोमवारचे व्रत फळांवर पाळले जाते. या उपवासात अन्न सेवन करण्यास मनाई आहे. या दिवशी सकाळी उठून स्नान वगैरे करून भगवान शंकराचा जलाभिषेक करावा. यानंतर भोलेनाथांना दूध, गंगाजल, मध, तूप, अक्षत आणि बेलपत्र इत्यादी अर्पण करावे. भगवान शंकराची पूजा विधीनुसार करावी. यानंतर, संध्याकाळी श्रावण सोमवार व्रत कथा वाचा किंवा ऐका. आरती करावी. भगवान शिवाच्या ॐ नमः शिवाय बीज मंत्राचा जप करावा.
स्कंद पुराणानुसार, भगवान शिवाला विचारले भगवान, सर्व महिन्यांमध्ये तुम्हाला श्रावण सर्वात जास्त का आवडतो? त्यावेळी भगवान शिव म्हणाले, 'माझ्याशी लग्न करण्यासाठी देवी सतीने कठोर तपश्चर्या केली आणि वडिलांच्या विरोधात जावे लागले. माझ्याशी लग्न केल्यानंतर, देवी सतीने जेव्हा तिच्या वडिलांच्या घरी माझा अपमान होताना पाहिला तेव्हा तिने आपल्या प्राणाची आहुती दिली. यानंतर हिमालयाच्या पर्वतराजाची कन्या म्हणून सतीचा जन्म झाला आणि तिचे नाव देवी पार्वती होते. या जन्मातही तिने माझ्याशी लग्न करण्यासाठी श्रावणात महिनाभर उपवास करून कठोर तपश्चर्या केली. त्यामुळे मी तिला माझी पत्नी म्हणून स्वीकारले. यामुळेच श्रावण सोमवारचा उपवास केल्याने अपेक्षित परिणाम मिळण्यास मदत होते. लग्न करू इच्छित असाल तर लवकर लग्न योग जुळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात आनंद मिळेल.
संबंधित बातम्या