Shravan Sankashti Chaturthi : यंदा श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत केले जाणार आहे. ऑगस्ट महिन्याची ही चतुर्थी हेरंब संकष्टी चतुर्थी म्हणून देखील ओळखली जाते. स्त्रिया संतती आणि दीर्घायुष्याच्या इच्छेसाठी हे व्रत करतात. चतुर्थीच्या दिवशी गणेश आणि चंद्र देवाची पूजा केली जाईल. जाणून घेऊया श्रावण संकष्टी चतुर्थी पूजेचा शुभ मुहूर्त, पद्धत, मंत्र, आणि चंद्रोदय वेळ-
चतुर्थी तिथी प्रारंभ - २२ ऑगस्ट २०२४ दुपारी १ वाजून ४६ मिनिटांनी
चतुर्थी तिथी समाप्ती - २३ ऑगस्ट २०२४ सकाळी १० वाजून ३८ मिनिटे.
सकाळी लवकर स्नानादी कार्य करून घ्या. देवघर स्वच्छ करा. देवघरातील देवांची मनोभावे पूजा करा. श्रीगणेशाचा जलाभिषेक करावा. गणपतीला फुले, फळे अर्पण करा आणि पिवळे चंदन लावा. तिळाचे लाडू किंवा मोदक अर्पण करा. संकष्टी चतुर्थीची कथा वाचा. ॐ गं गणपतये नमः या मंत्राचा जप करा. पूर्ण भक्तीभावाने गणेशाची आरती करा. सर्व मनोकामना पूर्ण होऊ द्या अशी प्रार्थना करा. क्षमा प्रार्थना करा.
मंत्र- ॐ गणेशाय नमः, ॐ गं गणपतये नमः
मुंबई - ९ वाजून २ मिनिटे
ठाणे - ९ वाजून २ मिनिटे
पुणे - ८ वाजून ५८ मिनिटे
रत्नागिरी - ९ वाजून १ मिनिटे
कोल्हापूर - ८ वाजून ५८ मिनिटे
सातारा - ८ वाजून ५८ मिनिटे
नाशिक - ८ वाजून ५८ मिनिटे
अहमदनगर - ८ वाजून ५४ मिनिटे
पणजी - ८ वाजून ५९ मिनिटे
धुळे - ८ वाजून ५४ मिनिटे
जळगाव - ८ वाजून ५० मिनिटे
वर्धा - ८ वाजून ३८ मिनिटे
यवतमाळ - ८ वाजून ४० मिनिटे
बीड - ८ वाजून ५० मिनिटे
सांगली - ८ वाजून ५६ मिनिटे
सावंतवाडी - ८ वाजून ५९ मिनिटे
सोलापूर - ८ वाजून ५० मिनिटे
नागपूर - ८ वाजून ३६ मिनिटे
अमरावती - ८ वाजून ४१ मिनिटे
अकोला - ८ वाजून ४५ मिनिटे
छत्रपती संभाजी नगर(औरंगाबाद) - ८ वाजून ५२ मिनिटे
भुसावळ - ८ वाजून ५० मिनिटे
परभणी - ८ वाजून ४६ मिनिटे
नांदेड - ८ वाजून ४३ मिनिटे
उस्मानाबाद - ८ वाजून ४९ मिनिटे
भंडारा - ८ वाजून ३४ मिनिटे
चंद्रपूर - ८ वाजून ३६ मिनिटे
बुलढाणा - ८ वाजून ४८ मिनिटे
इंदौर - ८ वाजून ४८ मिनिटे
ग्वाल्हेर - ८ वाजून ३८ मिनिटे
बेळगाव - ८ वाजून ५७ मिनिटे
मालवण - ९ वाजून १ मिनिटे