Shravan Putrada Ekadashi 2024 Vrat : एकादशी महिन्यातून दोनदा येते. एक कृष्ण पक्षात आणि एक शुक्ल पक्षात. वर्षभरात एकूण २४ एकादशी असतात. शुक्रवार, १६ ऑगस्ट २०२४ रोजी श्रावण पुत्रदा एकादशी व्रत केले जाईल. हिंदू धर्मात एकादशीचे व्रत अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. एकादशी व्रत हे भगवान विष्णूला समर्पित आहे.
पुत्रदा एकादशी वर्षातून दोनदा म्हणजेच पौष आणि श्रावण महिन्यात पाळले जाते. पुत्रदा एकादशीचे व्रत हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते. या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की ज्या विवाहीत जोडप्यांना संतती सुखाची इच्छा असते त्यांनी या दिवशी व्रत अवश्य ठेवावे. या व्रताचे पालन केल्याने संततीचे सुख आणि आशीर्वाद लाभतो. संततीच्या इच्छेने हे व्रत पाळल्यास भगवान विष्णूचा परम आशीर्वाद प्राप्त होतो.
अनेकवेळा लोकांचे एकादशीचे व्रत चुकून मोडले जाते, त्यामुळे व्यक्तीच्या मनात अनेक प्रकारचे विचार येतात. जाणून घ्या एकादशीचे व्रत मोडल्यास किंवा एकादशीचे व्रत करायला विसरलात तर काय करावे-
हिंदू धर्मग्रंथानुसार काही कारणाने एकादशीचे व्रत मोडल्यास भगवान विष्णूची पूजा करताना क्षमा प्रार्थाना करावी. आपली चूक मान्य करून भविष्यात अशी चूक न करण्याचा संकल्प घ्या. एकादशीचे व्रत मोडल्यास या गोष्टी करू शकतात-
१. सर्व प्रथम पुन्हा स्नान करा.
२. भगवान विष्णूला दूध, मध आणि दह्याने अभिषेक करा.
३. भगवान विष्णूची षोडशोपचार पूजा करा.
४. तुमच्या क्षमतेनुसार दान करा.
५. उपवास सोडल्यानंतर, आपल्या क्षमतेनुसार तुळशीच्या माळेने भगवान विष्णूच्या द्वादशाक्षर ॐ नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. किमान ११ माळ जप केल्याची खात्री करा.
श्रावण पुत्रदा एकादशीची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम वेळ सकाळी ६:२२ ते ७:५७ पर्यंत असेल. शुभ मुहूर्तावर पूजा केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात.
श्रावण पुत्रदा एकादशीचे व्रत शनिवार, १७ ऑगस्ट २०२४ रोजी उपवास सोडला जाणार आहे. व्रत सोडण्याची शुभ वेळ सकाळी ५:५१ ते ८:५ पर्यंत असेल. पारणतिथीच्या दिवशी द्वादशी समाप्तीची वेळ सकाळी ८.०५ आहे.
काही कारणाने एकादशीचे व्रत चुकले किंवा सुटले तर प्रायश्चित्त सोबतच निर्जला एकादशी व्रताचा संकल्प करू शकता. निर्जला एकादशी व्रतामध्ये अन्न आणि पाणी सेवन करण्यास मनाई आहे.