व्रत वैकल्यांचा पवित्र महिना श्रावण सुरू होत आहे. या महिन्यात येणार्या सण, समारंभांनी, व्रत-वैकल्यांनी भरलेल्या या महिन्यात प्रत्येक दिवस खास असतो. शिवभक्तीसाठी असलेला श्रावण महिना ५ ऑगस्टपासून सुरू होत असून, ३ सप्टेंबर रोजी श्रावण महिना संपन्न होईल. श्रावण महिना हा हिंदू पंचांगानानुसार भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, म्हणूनच या महिन्याला श्रावण महिना या नावाने संबोधित केले जाते.
श्रावण महिन्याला सणांचा राजा असे संबोधले जाते. कारण या विशिष्ट महिन्यात प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व प्रदान करण्यात आलेले आहे. श्रावण सोमवारी भगवान शंकराचे पूजन, मंगळवारी मंगळागौरी व्रत, बुधवारी बुधपूजन, गुरुवारी बृहस्पती पूजन, शुक्रवारी जरा जिवंतिका पूजन, शनिवारी अश्वत्थमारुती पूजन आणि रविवारी आदित्य पूजन केले जाते. तसेच, नागपंचमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, श्रीकृष्ण जयंती असे खास सणही याच महिन्यात साजरे केले जातात.
या खास श्रावण महिन्याच्या प्रारंभानिमित्त तुम्ही हे खास शुभेच्छा संदेश निवडू शकतात. वाचा, पाठवा आणि पोस्ट करा.
परंपरेचे करूया जतन
आला आहे श्रावण...
श्रावण महिन्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
…
श्रावण मासाला झाला प्रारंभ
करू शिवाच्या पूजेला आरंभ
ठेऊ शिवाचे व्रत
होईल श्रावणी सोमवार सुफळ संपूर्ण
श्रावणी सोमवारच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
…
शिव हेच सत्य आहे, शिव सुंदर आहे
शिव अनंत, शिव ब्रम्ह आहे
शिव आहे शक्ती आणि शिवच आहे भक्ती
श्रावणी सोमवारच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
…
आनंद माझ्या मनात माईना,
सृष्टी सजली बदलली दृष्टी
घेऊन सरींवर सरी आला तो माझ्या अंगणी
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!
…
चाहूल तुझी लागताच येते मन बहरून
अशा या श्रावण महिन्याच्या भरभरून शुभेच्छा!
…
रंग रंगात रंगला श्रावण
नभ नभात उतरला श्रावण
पानापानात लपला श्रावण
फुलाफुलांत उमलला श्रावण
श्रावण महिन्याच्या भरभरून शुभेच्छा!
…
संस्कृतीचा अनमोल ठेवा राखण्या
आला तो श्रावण पुन्हा आला…
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!
…
सणासुदीची घेऊन उधळण
आला रे आला हसरा श्रावण!
श्रावण महिन्याच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा!
…
निसर्ग आलाय बहरून,
मनही आलंय मोहरून,
रंगात तुझ्या नहाण्या,
मन होई पाखरू पाखरू
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!