शिवभक्तांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या सोहळ्याबद्दलही दोन गट आहे. काहींच्या मते तो ६ जून दिवशी ग्रेगेरियन कॅलेंडरप्रमाणे साजरा केला जातो. तर काहींच्या मते तो ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी दिवशी साजरा जातो.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे महान राजा आणि आराध्य दैवत मानले जातात. दरवर्षी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा हा उत्सव विशेष थाटामाटात साजरा केला जातो.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशीला राज्याभिषेक पार पडला होता. हा ऐतिहासिक दिवस सर्वांच्या स्मरणात असून, खास आठवणींना उजाळा देण्यासाठी आज २० जून रोजी तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन साजरा करूया आणि या शुभेच्छा संदेश देऊन दिवस आणखी खास बनवूया. या शुभेच्छा पोस्ट करा.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,
कुशल प्रशासनकर्ते छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांना
'राज्यभिषेक दिनी' मानाचा मुजरा!
…
मराठा राजा महाराष्ट्राचा म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती ओवाळूनी पंचारती
असा आमचा “राजा शिवछत्रपती”
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
…
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज,
शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
…
रयतेचे रक्षण ही एकच होती मनी आस;
स्वराज्याचा ज्याला लागतो हो ध्यास,
मुघलांना वाटत होती ज्यांची भीती,
असे आमचे शिवाजी राजे झाले ‘छत्रपती’,
शिवराज्याभिषेक दिनाच्या खास शुभेच्छा!
…
दगड-धोंड्यांच्या स्वराज्यात
सुवर्णसिंहासन सजलं,
इतिहासालाही धडकी भरेल
असं धाडसं या मातीत घडलं,
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
…
होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा
थाट हिंदवी स्वराज्याचा श्री शिवराज्याभिषेक दिन
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
…
मुघलांच्या गुलामगिरीतून रयतेस मुक्त करण्यास,
ज्यांनी जन्म घेतला या भूमीवरती;
पोवाडे, गौरव गीतांमधून,
आज घुमू दे त्यांची किर्ती आसमंती,
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
…
सह्याद्रीच्या रांगांवरती,
सदा मुघलांच्या नजरा,
बोटं छाटली तयांची,
त्या शिवबांना माझा मुजरा..
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
…
इतिहासाच्या पानावर,
रयतेच्या मनावर,
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती..
शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा!
…
अवघ्या महाराष्ट्राला लागला ज्यांचा लळा,
त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शिवभक्त झाले गोळा
डोळ्यांचे पारणं फेडणारा असा हा राज्याभिषेक सोहळा
शिवराज्याभिषेक दिनाच्या मनपूर्वक व हार्दिक शुभेच्छा
…
श्वासात राजं ध्यासात राजं
रणी धाव मार्तंड चंड तू प्रचंड
धाव साहुनीया तांडव हे कर तू
धुंद शंकरा श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!
शिवराज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
संबंधित बातम्या