छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे महान राजा आणि आराध्य दैवत मानले जातात. दरवर्षी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा हा उत्सव विशेष थाटामाटात साजरा केला जातो. ३५० वर्षांपूर्वी ६ जून १६७४ रोजी त्यांचा राज्याभिषेक झाला होता. १६७४ मध्ये त्यांनी मराठा साम्राज्याचा पाया घातला. रायगडमध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्यांना छत्रपती ही पदवीही देण्यात आली होती.
इतिहासकारांच्या मते शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे वडील शहाजी भोसले हे प्रबळ सरंजामदार होते. त्यांना लहानपणापासूनच राजकारण आणि युद्धाचे प्रशिक्षण मिळाले होते, म्हणून ते जगातील महान योद्ध्यांपैकी एक मानले जातात. शिवाजी महाराजांनी लहान वयातच आपले कौशल्य आणि युद्धकौशल्य दाखवून दिले होते. तोरणा किल्ला जिंकला होता आणि त्यानंतर मुघलांकडूनही अनेक क्षेत्रे हिसकावून घेतली होती. अशा या आपल्या राजाच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या दिनानिमित्त खास खास शुभेच्छा पाठवून, या ऐतिहासिक दिवसाला उजाळा देऊया.
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज,
शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
…
स्वराज्याचा ज्याला लागतो हो ध्यास,
रयतेचे रक्षण ही एकच होती मनी आस;
मुघलांना वाटत होती ज्यांची भीती,
असे आमचे शिवाजी राजे झाले ‘छत्रपती’,
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या खास शुभेच्छा!
…
इतिहासालाही धडकी भरेल
असं धाडसं या मातीत घडलं,
दगड-धोंड्यांच्या स्वराज्यात
सुवर्णसिंहासन सजलं
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
…
रायगडाचे माथे फुलांनी सजले
सह्याद्रीच्या कुशीत सनई चौघडे वाजले
पाहून सोहळा छत्रपती पदाचा
सर्वांचे मन आनंदाने भारावले
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा!
…
…
होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा
थाट हिंदवी स्वराज्याचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
…
मुघलांच्या गुलामगिरीतून रयतेस मुक्त करण्यास,
ज्यांनी जन्म घेतला या भूमीवरती;
पोवाडे, गौरव गीतांमधून,
आज घुमू दे त्यांची किर्ती आसमंती,
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
…
न भूतो न भविष्यती असा होता आपल्या राजाचा शिवराज्याभिषेक सोहळा
या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शिवभक्त झाले होते गोळा
शिवछत्रपतींच्या आठवणींना देऊ आज उजाळा
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा!
…
अवघ्या महाराष्ट्राला लागला ज्यांचा लळा,
त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शिवभक्त झाले गोळा
डोळ्यांचे पारणं फेडणारा असा हा राज्याभिषेक सोहळा
शिवराज्याभिषेक दिनाच्या मनपूर्वक व हार्दिक शुभेच्छा