Sai Baba Mandir Donation: शिर्डी येथील प्रसिद्ध साईबाबा संस्थान ट्रस्टतर्फे नाताळाची सुट्टी, सरत्या वर्षाला देण्यात येणारा निरोप आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी २५ डिसेंबर २०२४ ते ०२ जानेवारी २०२५ या कालावधीत शिर्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात शिर्डीच्या साईबाबांचे विशेष दर्शन, सर्वसामान्य भक्तांसाठी व्हीआयपी पासची व्यवस्था करण्यात आली होती.
या ९ दिवसांच्या महोत्सवादरम्यान ८ लाखाहून अधिक साईभक्तांनी शिर्डीच्या साईबाबाचे दर्शन घेतले. यावेळी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेत साईभक्तांनी तब्बल १६ कोटी ६१ लाख रुपयांचे दान केले आहे. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नाताळाची सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी २५ डिसेंबर २०२४ ते ०२ जानेवारी २०२५ पर्यंतच्या कालावधीत दान, टोल पास , डेबिट-क्रेडिट कार्ड, ऑनलाइन दान, चेक/डीडी आणि मनिऑर्डरच्या माध्यमातून ०१, ९६, ४४, २००/- रुपये, ०४,६५,७३,६९८?/- रुपये, एकूण १५ कोटी ९७ लाख ३७ हजार २८१ रुपयाचे रोख रकमेचे दान पडले आहे.
या बरोबरच ८०९, २२० ग्रॅम सोने (५४,४९,६८६/- रुपये) दान केले गेले आहे. अशा प्रकारे संस्थेला एकूण १६ कोटी ६१ लाख ८० हजार ८६२ रुपये विभिन्न माध्यामातून प्राप्त झाले आहेत. यासह या कालावधीत ६ लाखाहून अधिक साईभक्तांनी श्री साई प्रसादालयात मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. तसेच ३५ हजारांहून अधिक साईभक्तांना भोजन पाकिटांचा लाभ मिळाला आहे.
याबरोबरच ०९,४७,७५० लाडू प्रसाद पाकिटांची विक्री झाली आहे. तर १ कोटी ८९ लाख ५५ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. तसेच, ५, ९८,६०० साईभक्तांनी मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचा लाभ घेतला.
साईबाबा संस्थानाने दिलेल्या माहितीनुसार, संस्थानाला मिळालेल्या दानाचे वाटप साईबाबा रुग्णालय, साई प्रसादालय मोफत भोजन, संघटनेच्या विविध शैक्षणिक संस्था आणि बाह्यरुग्णांसाठी, तसेच विविध सुविधांसाठी, विविध सामाजिक कार्यांसाठी केले जाण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी एका साईभक्त महिलेने मंदिरात साईबाबांना १३ लाख रुपये सोन्याच्या हाराचे दान केले होते.
संबंधित बातम्या