फेब्रुवारीमध्ये पौष कृष्णपक्षाच्या एकादशी तिथीला षट्तीला एकादशी म्हणतात. या दिवशी तिळाचा वापर अत्यावश्यक आहे. चला जाणून घेऊया षट्तीला एकादशीची तिथी, शुभ योग, मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व.
प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात. पारंपारिक धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. एकादशी ही भगवान विष्णूला समर्पित आहे. महाराष्ट्रात एकादशीला संत मेळावा व वारकऱ्यांची पालखी निघते. आषाढी व कार्तिकी एकादशीला पंढरपूरला मोठा सोहळा संपन्न होतो व यात्रा भरते. या दिवशी उपवासासह पूजा केल्यास भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. या व्रताच्या प्रभावामुळे पापातून मुक्ती मिळते.
फेब्रुवारी महिन्यातील पौष कृष्ण पक्षाच्या एकादशीला षट्तीला एकादशी केली जाईल. या दिवशी तिळाचा वापर अत्यावश्यक आहे. या व्रतामध्ये तीळ दान केल्याने मोक्ष प्राप्त होतो, अशी मान्यता आहे.
पंचांगानुसार, पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी फेब्रुवारी महिन्यात ५ तारखेला संध्याकाळी ५ वाजून २४ मिनिटांनी सुरू होईल. तर ६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ४ वाजून ७ मिनिटांनी संपेल. उदयातिथीनुसार ६ फेब्रुवारीला षट्तीला एकादशी साजरी होणार आहे.
तिळाच्या सहा प्रकारामुळे ही एकादशी षट्तिला एकादशी म्हणून ओळखली जाते.
१. तीळ स्नान, २. तीळ उटणे, ३. तीळ हवन, ४. तीळ तर्पण, ५. तीळ भोजन, ६. तीळ दान हे तिळाचे सहा प्रकार आहे. आणि हे व्रत केल्याने अनेक पाप नष्ट होतात आणि मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते असे सांगितले जाते.
एकादशीचे व्रत विधीनुसार पाळावे. जर तुम्ही षट्तीला एकादशीला उपवास करणार असाल तर एकादशीला ब्रह्म मुहूर्तावर उठून घर स्वच्छ करावे. स्नान करून देवी-देवतांचे ध्यान करावे. यानंतर उपवासाचा संकल्प करावा. नित्य देवपूजेनंतर भगवान विष्णूचीही विधीवत पूजा करा. देवतेला फुले, पाणी, धूप, दिप अर्पण करा. आरती करून क्षमा प्रार्थना करा. प्रसाद वाटा. या दिवशी गरजूंना अन्नदान करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी व्रत सोडावे.