Good Morning Wishes in Marathi: एक नवीन सुरुवात, आठवणी बनवण्याची नवी संधी आणि ज्यांची आपण काळजी घेतो त्यांना आनंद पसरवण्याची संधी नवी सकाळ देत असते. दिवसाची सुरुवात एखाद्या खास संदेशाने झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो, असं म्हटलं जातं. अर्थात जर कोणी तुम्हाला मेसेज केला तर तो अगदी निवडक असतो. अशा वेळी तुम्ही काही निवडक मेसेजच्या माध्यमातून तुमच्या मित्र मैत्रिणींना तसेच प्रियजनांना गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा देऊ शकता. येथे पाहा लेटेस्ट गुड मॉर्निंग मेसेज
मनाने जोडलेल्या नात्याला
कोणत्यात नावाची गरज नसते
कारण न सांगता जुळणाऱ्या नात्यांची
परिभाषाच वेगळी असते
शुभ सकाळ
चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला,
मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही,
आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहेत,
ती पण तुमच्या सारखी..!
गुड मॉर्निंग
साखरेची गोडी सेकंदच राहते
पण माणसच्या स्वभावातील गोडी मात्र
शेवटपर्यंत मनात घर करून जाते
शुभ सकाळ
सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात,
नाजूक उन्हाची प्रेमळ साद,
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ…
गुड मॉर्निंग
नाते सांभाळायचे असेल तर
चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी,
आणि नाते टिकवायचे असेल तर
नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी
शुभ सकाळ
प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो
म्हणून काही माणसे क्षणभर
तर काही माणसे
आयुष्यभर लक्षात राहतात
गुड मॉर्निंग
नाती तयार होतात हेच खूप आहे
सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे
दर वेळी प्रत्येकाची सोबत होईल असं नाही
एकमेकांची आठवण काढत आहोत हेच खूप आहे
शुभ सकाळ
गुलाब कोठेही ठेवला तरी
सुगंध हा येणारंच
आणि तुमच्यासारखी प्रेमळ माणसे
कोठेही असली तरी
आठवण ही येणारंच
शुभ सकाळ