Navratri Special : नवरात्रीत दुर्गापूजेच्या वेळी बंगाली संस्कृतीत हिल्स मासा महत्त्वाचा का आहे?-shardiya navratri 2024 why hills fish is important in bengali culture during durga puja ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Navratri Special : नवरात्रीत दुर्गापूजेच्या वेळी बंगाली संस्कृतीत हिल्स मासा महत्त्वाचा का आहे?

Navratri Special : नवरात्रीत दुर्गापूजेच्या वेळी बंगाली संस्कृतीत हिल्स मासा महत्त्वाचा का आहे?

Oct 01, 2024 07:21 PM IST

Why Hills Fish Important On Durga Puja : नवरात्राचे वैविध्य म्हणजे विविध प्रातांनुसार विविध मान्यता आणि नवरात्रोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. जाणून घ्या बंगालमध्ये दुर्गा पूजेत हिल्सा मासा महत्वाचा का आहे.

दुर्गापूजेच्या वेळी हिल्सा मासा का महत्वाचा असतो
दुर्गापूजेच्या वेळी हिल्सा मासा का महत्वाचा असतो

अश्विन शुध्द प्रतिपदेपासून शरद ऋतुचे आगमन होते. प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजर्‍या होणार्‍या देवीच्या या उत्सवास शारदीय नवरात्र म्हणतात. ९ दिवस उत्सव चालतो म्हणून नवरात्र. १०व्या दिवशी उत्सवाची समाप्ती होते. आपल्या घरावर व कुटुंबियांवर कृपाछत्र असावे आणि अदृष्य शक्तीपासून आपल्याला व आपल्या कुटुंबाला संरक्षण मिळावे या हेतूने शास्त्रात नवरात्र व्रत सांगितलेले आहे.

नवरात्रात नऊ दिवस उपवास करण्याची प्रथा आहे. देवीचे उपवास करण्याचे कडक नियम असल्याचे सांगितले जाते. नवरात्रीचे उपासना करताना मन व शरीर शुद्ध राहावे, देवीचे सानिध्य लाभावे हा उद्देश आहे. ह्यामागे एकट्या दुकट्याचा विचार नसून संपूर्ण कुल परंपरेचा विचार केलेला आहे. नवरात्रात देवीला फुलोरा करण्याची पद्धत आहे. नवरात्रात अष्टमीला होम करण्याची प्रथा आहे. नवरात्रात दररोज विशिष्ठ संख्येने दुर्गा सप्तशतीचे पाठ केले जातात. 

नवरात्रात देवीचे रोज मालाबंधन करतात, प्रत्येक दिवशी तिच्या रूपाप्रमाणे मालाबंधन करावे. नवरात्रीत अखंड दिवा लावण्याची परंपरा आहे. घटस्थापनेला अखंड दिवा लावला जातो आणि संपूर्ण नऊ दिवस हा दिवा तेवत ठेवला जातो, त्याची काळजी घ्यावी लागते. 

नवरात्राचे वैविध्य म्हणजे विविध प्रातांनुसार विविध मान्यता आणि नवरात्रोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. महाराष्ट्रात देवीचे घट स्थापन करून खास उपवास करतात. गुजराथ मध्ये नवरात्रीत गरबा खेळण्याची परंपरा आहे तर पश्चिम बंगालमधील दुर्गा पूजा प्रसिद्ध आहे. या दुर्गा पूजेत हिल्सा मासालाही खास महत्व आहे ते जाणून घेऊया.

बंगालमध्ये दुर्गा पूजेत हिल्सा मासा महत्वाचा

हिल्सा मासा, ज्याला इलिश देखील म्हटले जाते, बंगालच्या पाककृती आणि सामाजिक पद्धतींमध्ये एक अपवादात्मक स्थान आहे. हा मासा चवदार आहे, यामुळे हा मासा बहुमोल आहे. प्रामुख्याने भारतीय उपखंड आणि आग्नेय आशियामध्ये आढळणारे हिल्सा मासे बांगलादेश, भारत आणि म्यानमार सारख्या राष्ट्रांमध्ये स्थानिक अन्नाचा एक अपरिहार्य भाग बनला आहे.

बंगाली संस्कृतीत हिल्सा किंवा इलिश मासे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. लग्नाच्या विधींपासून ते दुर्गापूजा समारंभापर्यंत, हिल्सा मासे या प्रदेशातील पवित्र बलिदानासाठी महत्त्वपूर्ण आहे, दुर्गापूजेदरम्यान पश्चिम बंगालमध्ये इलिश हे केवळ शुभच नाही तर बांगलादेशचे राष्ट्रीय मासे देखील मानले जाते. इलिश हा बांगलादेशचा राष्ट्रीय मासा देखील आहे. त्याला "माशाचा राजा" असेही म्हणतात. बांगलादेश जगातील सुमारे ७०% इलिश उत्पादन करतो, ज्यामुळे तो सार्वजनिक अभिमानाचा विषय बनतो. 

Whats_app_banner
विभाग