Shardiya Navratri Akhand Jyot Niyam : नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. देवीला प्रसन्न करण्यासाठी नऊ दिवस उपवास करून घटस्थापना करतात. तसेच नऊ दिवसांसाठी अखंड ज्योत पेटवली जाते. अखंड ज्योती म्हणजे नऊ दिवस न विझणारी ज्योत. प्रतिपदेच्या दिवशी कलशाच्या स्थापनेच्या वेळी ही ज्योत प्रज्वलित केली जाते.
तुम्ही देखील नवरात्रीत अखंड ज्योत पेटवणार असाल तर त्यासंबंधी अनेक गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. अखंड ज्योत का पेटवतात आणि यासंबंधी नियम जाणून घ्या.
आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १२ वाजून १८ मिनिटा पासून सुरू होईल. ४ ऑक्टोबरला पहाटे २.५८ वाजता प्रतिप्रदा समाप्त होईल. अशा परिस्थितीत ३ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. तर शारदीय नवरात्रीची सांगता ११ ऑक्टोबरला होणार आहे. विजयादशमी हा सण दुसऱ्या दिवशी म्हणजेच १२ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल.
मान्यतेनुसार घरांमध्ये घटस्थापना केल्यानंतर अखंड ज्योती पेटवली जाते. अखंड ज्योती म्हणजे अशी ज्योत जी खंडित होत नाही. अखंड प्रकाशाने घरात समृद्धी येते आणि देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो, भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. म्हणून अखंड ज्योत पेटवली जाते.
जर तुम्ही अखंड ज्योत पेटवत असाल तर लक्षात ठेवा की त्यासाठी ज्योतीचा दिवा आणि वात इतका मोठा असावा की तो बराच काळ जळत राहील.
अखंड ज्योत सांभाळायची आहे. म्हणून लक्षात ठेवा की, स्नान करून शुद्ध झाल्यावर अखंड ज्योतीत तूप, तेल टाकत राहावे.
अखंड ज्योतला कधीही घाणेरड्या हातांनी स्पर्श करू नये. अखंड ज्योती लावण्यासाठी वापरलेला दिवा किंवा तुटलेला दिवा वापरू नये. या दिव्याची वातही अखंड ज्योतीसाठी योग्य असायला हवी.
अखंड ज्योत तांदुळाने भरलेल्या ताटात असावी. देवीजवळ जमिनीवर नाही तर तांदूळाने भरलेल्या ताटात अखंड ज्योत ठेवली जाते.
ज्या ठिकाणी ज्योत पेटत आहे त्या ठिकाणी कुलूप लावू नये. म्हणजे ती खोली प्रकाशीत असावी तीन-चार तास जळत राहतील इतके तूप त्यात भरावे. अखंड ज्योत विझलेली नाही हे पुन्हा पुन्हा तपासावे.
कन्यापूजेनंतर अखंड ज्योत आपोआप संपते. जर काही कारणास्तव तुम्ही तुमच्या घरात अखंड ज्योत लावू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या नावाने असलेल्या अखंड ज्योतीचे साहित्य एखाद्या मंदिरात दान करावे.
टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.