Navratri : ३ ऑक्टोबरपासून नवरात्री; देवीच्या पालखीत येण्याने मानवी जीवनावर काय परिणाम होईल जाणून घ्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Navratri : ३ ऑक्टोबरपासून नवरात्री; देवीच्या पालखीत येण्याने मानवी जीवनावर काय परिणाम होईल जाणून घ्या

Navratri : ३ ऑक्टोबरपासून नवरात्री; देवीच्या पालखीत येण्याने मानवी जीवनावर काय परिणाम होईल जाणून घ्या

Published Sep 23, 2024 05:25 PM IST

Shardiya Navratri Devi Durga : यंदा ३ ऑक्टोबरपासून नवरात्री उत्सव साजरा होणार आहे. शारदीय नवरात्री मध्ये दुर्गा देवी वेगवेगळ्या वाहनावर विराजमान होऊन येते आणि याचा परिणाम जनमानसावरही होतो. जाणून घ्या यंदा देवी पालखीत बसून आल्यामुळे मानवी जीवनावर काय परिणाम होईल.

नवरात्रीत देवीच्या पालखीत येण्याने मानवी जीवनावर परिणाम
नवरात्रीत देवीच्या पालखीत येण्याने मानवी जीवनावर परिणाम

Shardiya Navratri Devi Durga Vahan : नवरात्र हा खास काळ आहे. या नऊ दिवसांमध्ये लोक देवीच्या नऊ रूपांची पूजा करतात. शेवटच्या दिवशी, दसऱ्याने नवरात्र समाप्त होते.

नवरात्र हा नऊ रूपांचा उत्सव यंदा ३ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. वर्षात चार नवरात्र असतात. दोन गुप्त नवरात्र असतात आणि दोन मुख्य नवरात्र असतात. पितृ पंधरवडा संपल्यानंतर नवरात्रीला सुरवात होते या नवरात्रीला शारदीय नवरात्र म्हणतात. यावर्षी एप्रिल महिन्यात येणाऱ्या चैत्र नवरात्रीच्या काळात देवी घोड्यावर स्वार होऊन आली होती. तर शारदीय नवरात्रीमध्ये देवी माता पालखीत किंवा डोलीत स्वार होऊन येत आहे. देवी कोणत्या वाहनात येते यानुसार याचा परिणाम जनमानसावरही होतो. यावेळी गुरुवारपासून नवरात्रोत्सव सुरू होत असल्याने मातेची स्वारी पालखीची आहे. यंदा नवरात्रीचे नऊ दिवस आहेत. नवरात्रीच्या नऊ दिवसांनंतर १२ ऑक्टोबरला दसरा सण साजरा होणार आहे.

वारानुसार ठरते देवीचे वाहन

दुर्गा माता रविवारी किंवा सोमवारी येते तेव्हा ती हत्तीवर स्वार होऊन येते.

बुधवारी नवरात्रीला सुरुवात झाली, तर दुर्गेचे आगमन बोटीने होते.

गुरुवारी किंवा शुक्रवारी दुर्गा देवीचे पालखीत आगमन झालेले दिसते.

नवरात्रीची सुरुवात शनिवार किंवा मंगळवारी झाली तर ती घोड्यावर स्वार होऊन येते.

दुर्गा देवीचे कोणते वाहन कसा परिणाम करते

जेव्हा दुर्गा देवी हत्तीवर येते तेव्हा जास्त पाऊस पडतो, ज्यामुळे चांगले पीक येते.

दुर्गा माता घोड्यावर आल्यावर युद्धसदृश परिस्थिती निर्माण होते.

जेव्हा दुर्गा माता बोटीवर येते तेव्हा ते शुभ असते आणि चांगले परिणाम आणते.

जेव्हा दुर्गा देवी डोलीवर किंवा पालखीवर येते तेव्हा महामारीची भीती असते.

नवरात्रीचा सर्वसामान्यांवर होणारा परिणाम

नवरात्रीच्या काळात देवी कोणत्या वाहनात येते याला खूप महत्त्व असते. असे म्हणतात की, देवी माता कोणत्याही वाहनात आली तरी त्याचा प्रभाव लोकांवर पडतो. यंदा मातेचे वाहन पालखी असल्याचे बोलले जात असून, याला सर्वसामान्य नागरिक चांगले मानत नाहीत. त्याला अशुभ म्हणतात. ज्योतिषांच्या मते, यामुळे लोकांना काही संकटांना सामोरे जावे लागू शकते आणि महामारीची भिती चिंतीत करणारी राहू शकते. एकूणच देवीचे हे यंदाचे पालखी किंवा घोड्यावर होणारे आगमन हे अशुभ मानले जात आहे. तर दुर्गेचे हत्ती आणि बोटीवर स्वार होणे अत्यंत शुभ मानले जाते. घटस्थापना नवरात्रीच्या प्रतिपदेला होईल.

 

Whats_app_banner