Shardiya Navratri 2023 : सिंहावर नव्हे हत्तीवर स्वार होऊन येणार दुर्गामाता; काय आहे देवीच्या वाहनाचा अर्थ?
shardiya navratri 2023 date : दुर्गेच्या वाहनाचं विशेष महत्त्व सांगण्यात आलं आहे. पूजाअर्चा करत भाविक देवीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असतात.
shardiya navratri 2023 durga vahan : यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव आजपासून सुरू होणार आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये नवरात्रीसाठी भाविकांनी गर्दी करत आवश्यक साहित्यांची खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी अनेक भाविक दुर्गामातेच्या वेगवेगळ्या रुपांची पूजा करत आयुष्यात सुख-शांती आणि समृद्धीसाठी पार्थना करत असतात. याशिवाय नवरात्रीच्या दिवसांमध्ये असंख्य भाविक उपवास ठेवत दुर्गामातेला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु नवरात्रीला देवीची पूजा करत असताना दुर्गामातेच्या वाहकाचं विशेष महत्त्व शास्त्रात सांगण्यात आलं आहे.
ट्रेंडिंग न्यूज
जंगलाचा राजा सिंह हा दुर्गामातेचं वाहक असल्याचा उल्लेख पुराणांमध्ये आलेला आहे. परंतु ज्यावेळी दुर्गामाता धरतीवर येते, त्यावेळी तिचा वाहक बदलतो. नवरात्रीची सुरुवात होताच हत्ती हा दुर्गामातेचं वाहक होत असतो. सिंहा सोबतच हत्तीचं देखील महत्त्व शास्त्रांमध्ये सांगण्यात आलं आहे. मनुष्य, घोडा आणि म्हैस हे प्राणी देखील दुर्गामातेचे वाहक समजले जातात. रविवारी म्हणजेच आजपासून शारदीय नवरात्रीची सुरुवात होणार आहे. त्यामुळं आजपासून हत्ती हा दुर्गामातेचं वाहक असणार आहे.
दुर्गामातेच्या वाहनाचं महत्त्व काय?
शारदीय नवरात्री रविवार पासून सुरू होत असेल तर हत्ती हे दुर्गामातेचं वाहक असणार आहे. दुर्गामातेचं वाहक हत्ती असेल तर ते जास्त वर्ष जगण्याचं संकेत देत असतात. मंगळवार किंवा शनिवार पासून जर नवरात्रीची सुरुवात होणार असेल तर त्यावेळी घोडा हा दुर्गामातेचं वाहक असतो. घोडा दुर्गामातेचं वाहक असेल तर हे सत्तापरिवर्तनाचे संकेत असतात. गुरुवार किंवा शुक्रवार पासून नवरात्रीची सुरुवात होणार असेल तर त्यावेळी डोली हे दुर्गामातेचं वाहक असते, हे तांडवाचं संकेत असतात. जर बुधवार पासून नवरात्रीची सुरुवात होणार असेल तर सुख आणि समृद्धीचं प्रतीक समजलं जातं.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)