मराठी बातम्या  /  धर्म  /  Shanivar Upay : शनिवारी हे सोपे उपाय करा, जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळेल

Shanivar Upay : शनिवारी हे सोपे उपाय करा, जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळेल

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 02, 2024 01:04 PM IST

Shanivar Che Upay : शनिवारी शनिदेवाची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी जे लोक शनिदेवाची पूर्ण भक्तिभावाने पूजा करतात त्यांना सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते.

shanivar che upay
shanivar che upay

हिंदू शास्त्रानुसार प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो. याचप्रमाणे ज्योतिष शास्त्रात शनिवार या दिवसाचेही खूपच खास महत्व आहे. या दिवशी शनिदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे. असे म्हटले जाते, की या दिवशी जे लोक शनिदेवाची पूजा करतात त्यांना सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते.

शनिवार च्या दिवसासंदर्भात शास्त्रांमध्ये अनेक नियम आणि उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यांचे पालन केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. चला तर मग जाणून घेऊया शनिवारचे काही खास उपाय.

शनिवारी हे सोपे उपाय करा

शनिवारी सकाळी आंघोळ केल्यावर स्वच्छ कपडे घाला. यानंतर विधीनुसार शनिदेवाची पूजा करावी.

शनिवारी या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. 

दर शनिवारी ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करावा. याचा जप केल्याने कुंडलीतील शनि दोष दूर होतो.

या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडासमोर चार बाजू असलेला दिवा लावावा. यामुळे घरातील सदस्यांना आशीर्वाद मिळतात. तसेच जीवनात सुख-शांती नांदेल. ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी काळ्या कुत्र्यांना भाकरी खाऊ घालणे शुभ मानले जाते. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात.

नोकरीत प्रमोशन मिळण्यासाठी शनिवारी पाण्यात काळा कोळसा सोडावा. असे केल्याने उत्पन्न वाढेल.

जर तुम्हाला प्रेमविवाह करायचा असेल तर त्यासाठी शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. त्यानंतर शनिदेवाला तुमच्या मनातील इच्छा सांगा.

 

 

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)S

WhatsApp channel

विभाग