मराठी बातम्या  /  धर्म  /  Shani Shingnapur : जगातलं एकमेव गाव जिथे घरांना नाही दरवाजे

Shani Shingnapur : जगातलं एकमेव गाव जिथे घरांना नाही दरवाजे

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Feb 01, 2023 11:49 AM IST

Shani Shingnapur Has No Doors To Houses : आता तुम्हाला वाटत असेल की हे गाव अमेरिकेत किंवा इंग्लंडमध्ये असेल. मात्र जगातलं एकमेव गाव जिथं घरांना आजही कुलूप लावलं जात नाही ते गाव चक्क आपल्या महाराष्ट्रात आहे.

शनि शिंगणापूर
शनि शिंगणापूर (हिंदुस्तान टाइम्स)

Shani Shingnapur Has No Doors To Houses

प्रत्येक गोष्ट कडीकुलुपात असलेली चांगली असते असं घरातली थोर मंडळी सांगतात. इतकंच काय तर आपल्याला खाली एखादी वस्तू आणायची असेल तरीही आपण घर बंद करुन खाली उतरतो. या मागचं कारण एकच असतं ते म्हणजे आपण मेहनतीने कमावलेल्या गोष्टी सुरक्षित राहाव्यात. घरात झालेली एक चोरी आपलं सारंकाही गमावण्यासाठी पुरेशी असते. मात्र जगात एक गाव असं आहे ज्या गावात घरांना आजही कुलूप लावलं जात नाही. ज्या घरातल्या खिडक्या नेहमी खुल्या असतात. आता तुम्हाला वाटत असेल की हे गाव अमेरिकेत किंवा इंग्लंडमध्ये असेल. मात्र जगातलं एकमेव गाव जिथं घरांना आजही कुलूप लावलं जात नाही ते गाव चक्क आपल्या महाराष्ट्रात आहे. ऐकून धक्का बसला. मग चला आज या गावाविषयी थोडी माहिती घेऊया.

महाराष्ट्रातलं एक गाव जिथं घरांना आजही नाही लावलं जात कुलूप

त्याआधी आपण शनि देवाविषयी थोडी माहिती घेऊया. शनिदेवांना न्यायाची देवता म्हणून ओळखलं जातं. शनि ग्रह हा सर्वात धीम्या गतीने चालणारा ग्रह आहे. मात्र असं असूनही शनिची चाल सर्वात महत्वाची मानली जाते. ज्या गावाबद्दल आपण बोलणार आहोत तिथं तर या प्रकोप करणाऱ्या शनिदेवानं आपलं बस्तान बसवलं आहे. या गावात शनि देवाची काळ्या रंगाची प्रतिमा कुठून आली कशी आली याची फारच कमी माहिती आहे. मात्र पुरातन काळी पावसात आलेल्या पुरात ही काळ्या रंगाची मूर्ती वाहात आली असावी असं सांगितलं जातं.

शनि शिंगणापूर इथं का होत नाही चोरी?

मान्यतेनुसार शनिदेव जेव्हापासून शिंगणापुरात विराजमान झाले, त्याच दिवसापासून तेथे चोरी, दरोड्यासारख्या घटना घडल्या नाहीत. संपूर्ण जगात हे एकमेव गाव आहे, जिथे आजही घरांना दरवाजे नाहीत. अनेकवेळा लोकांनी तेथे चोरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते अयशस्वी झाले आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले.

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग