Shani Rahu and Ketu Dosh Upay : तुमच्यावरही आहे शनी, राहू-केतूचा प्रकोप? घराजवळ 'हे' वृक्ष लावल्यास मिळेल आराम
मराठी बातम्या  /  धर्म  /  Shani Rahu and Ketu Dosh Upay : तुमच्यावरही आहे शनी, राहू-केतूचा प्रकोप? घराजवळ 'हे' वृक्ष लावल्यास मिळेल आराम

Shani Rahu and Ketu Dosh Upay : तुमच्यावरही आहे शनी, राहू-केतूचा प्रकोप? घराजवळ 'हे' वृक्ष लावल्यास मिळेल आराम

Published Jul 06, 2024 11:32 AM IST

Neem Tree Religious Significance : कडुनिंबाचे वैद्यकीय महत्व तर आहेच शिवाय धार्मिक आणि अध्यात्मिक महत्वसुद्धा आहे. वास्तविक हे झाड आपल्याला सहजपणे सर्वत्र पाहायला मिळते.

कडूलिंबाच्या झाडाचे धार्मिक महत्व
कडूलिंबाच्या झाडाचे धार्मिक महत्व

निसर्गात उपलब्ध असलेले प्रत्येक झाड खासच असते. प्रत्येक झाडापासून मनुष्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारचा फायदा मिळतच असतो. परंतु आज आपण एका अशा झाडाबाबत जाणून घेणार आहोत, ज्याचे वैद्यकीय महत्व तर आहेच शिवाय धार्मिक आणि अध्यात्मिक महत्वसुद्धा आहे. वास्तविक हे झाड आपल्याला सहजपणे सर्वत्र पाहायला मिळते. या झाडाच्या मदतीने अनेक आजार दूर होतात.

शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार या तुमच्या घराच्या अंगणात हे झाड असेल तर तुमच्यावर असलेला शनिदेवाचा आणि राहू-केतूचा प्रकोप दूर होण्यास मदत होते. त्यामुळेच ज्योतिषशास्त्रात हे झाड आवर्जून लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हे झाड इतर कोणते नसून कडूलिंबाचे झाड होय. या झाडाचे औषधीय महत्व आपल्याला माहितीच आहे. आता आपण याच धार्मिक महत्व जाणून घेऊया.

कडूलिंबाच्या झाडाचे धार्मिक महत्व

मंगळला ग्रहांचा सेनापती असे संबोधले जाते. मंगळचा शुभ प्रभाव असेल तर ते लोक प्रचंड सुखी होतात. मात्र मंगळचा अशुभ प्रभाव असेल तर त्या व्यक्तीला प्रचंड त्रास सहन करावा लागतो. अशात शास्त्रानुसार कडूलिंबाच्या झाडापासून मिळणाऱ्या लाकडीचा (दातून) वापर केल्यास मंगळ ग्रहाचा अशुभ प्रभाव दूर होण्यास मदत होते. वैदिक शास्त्रानुसार कडुलिंबाचा उपयोग देवी आणि शक्तीच्या पूजेसाठी केला जातो. शिवाय त्याच्या लाकडाने हवन केल्याने शनिदेवाचा प्रकोप दूर होतो. आणि शनिदेवाची शुभ कृपादृष्टी लाभते.

ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीवर केतूचा प्रकोप असेल तर अंघोळीच्या पाण्यात कडुनिंबाची पाने घालून अंघोळ केल्याने केतूदोष दूर होतो. शनिदोष आणि राहुदोषसुद्धा कमी होण्यास मदत होते. घराच्या चहूबाजूला कडुनिंबाची पाने अडकवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. घराचा वाईट नजरेपासून बचाव होतो. शिवाय कडुनिंबाचा उपयोग कुष्ठरोगात केला जातो. याच्या वापराने रुग्णांना आराम मिळतो.

कडुनिंबाचे झाड नेमके कुठे लावावे?

ज्योतिषअभ्यासानुसार कडुनिंबाचे झाड लावण्याचेसुद्धा काही नियम आहेत. या नियमांनुसार झाड लावल्यास त्याचा चांगला लाभ मिळतो. शास्त्रानुसार घराच्या दक्षिण दिशेला कडुनिंबाचे झाड लावल्यास मंगळची कृपादृष्टी लाभते. ज्या लोकांना विविध दोषांपासून सुटका हवी असेल आणि नकारात्मक ऊर्जा दूर ठेवायची असेल, तर त्यांनी घराच्या दक्षिण दिशेला कडुनिंबाचे झाड अवश्य लावा. ज्योतिषीय अभ्यासानुसार कडुनिंबाच्या झाडामध्ये शनिदेव आणि केतूचा प्रकोप शांत करण्याचे गुणधर्म असतात. शिवाय घराच्या वायव्य दिशेला हे झाड लावल्यास धन आणि शत्रूंसंबंधी समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार मकरानी कुंभ राशीच्या लोकांनी कडुनिंबाचे झाड लावल्यास प्रचंड लाभ मिळतो.

Whats_app_banner