मराठी बातम्या  /  धर्म  /  Shani Pradosh Vrat 2023 : शनि प्रदोषाचे मुहूर्त कोणते?, कशी कराल पूजा?

Shani Pradosh Vrat 2023 : शनि प्रदोषाचे मुहूर्त कोणते?, कशी कराल पूजा?

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Jul 01, 2023 09:02 AM IST

Shani Pradosh Vrat 2023 : शनि प्रदोष व्रताचा संकल्प कसा करावा आणि शनि प्रदोष व्रत कसं करावं हे जाणून घेऊया.

शनि प्रदोष व्रताचे मुहूर्त
शनि प्रदोष व्रताचे मुहूर्त (HT)

भगवान शिवाला समर्पित असलेलं शनि प्रदोष व्रत आज पाळण्यात येणार आहे. हे व्रत मुख्यत्वे ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा असते ती जोडपी हे व्रत करतात. या व्रताच्या प्रभावाने सर्व संकटंही दूर होतात असं सांगण्यात आलं आहे. आजचे शनि प्रदोष व्रताचे शुभ मुहूर्त कोणते आणि शनि प्रदोष व्रत कसं करावं हे आपण जाण न घेणार आहोत.

ट्रेंडिंग न्यूज

शनि प्रदोष व्रताचे शुभ मुहूर्त कोणते?

पंचांगानुसार, आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी ३० जुलैच्या शुक्रवारी रात्री ०१.१६ पासून सुरू होऊन ०१ जुलै शनिवारी रात्री ११.०६ पर्यंत राहील. त्रयोदशी तिथीचा सूर्योदय ०१ जुलै रोजी होणार असल्याने याच दिवशी शनि प्रदोष व्रत पाळण्यात येणार आहे. या व्रतामध्ये संध्याकाळी शंकराची पूजा करावी असं सांगितलं गेलं आहे. पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी ०७.२२ ते रात्री ०९.२३पर्यंत असेल.

कसं कराल शनि प्रदोष व्रत?

शनिवार, ०१ जुलै रोजी सकाळी लवकर उठल्यानंतर आंघळ करुन तुम्ही या व्रताचा संकल्प करू शकता. हे व्रत निर्जळी करावं असा नियम आहे. मात्र तुम्ही निर्जळी व्रत करू शकत नसाल तर पाणी पिऊ शकता.

दिवसभर सात्विक नियमांचे पालन करा आणि वर उल्लेख केलेल्या मुहूर्तावर संध्याकाळी भगवान शंकराची पूजा करा. सर्व प्रथम, भगवान शंकरासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि हार आणि फुले अर्पण करा.

यानंतर भगवान शिवाला बिल्वपत्र, गंगाजल, अबीर, तांदूळ इत्यादी अर्पण करा. पूजा करताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. आपल्या इच्छेनुसार भगवंताला नैवेद्य अर्पण करा आणि शेवटी आरती करा.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग