मराठी बातम्या / धर्म /
Shani Pradosh Vrat 2023 : झोपलेलं भाग्य होईल जागं, आज शनिप्रदोषाच्या दिवशी करा 'या' गोष्टी
Shani Pradosh Vrat 2023 : जुलै महिन्याचा आज पहिला दिवस आहे. आज शनि प्रदोष व्रत आहे. काही खास उपाय आपल्यावर महादेवाची कृपा करु शकतात.
शनि प्रदोष व्रत (HT)
आज जुलै महिन्याचा पहिलाच दिवस आहे आणि आज प्रदोष आहे. जुलै महिन्याची सुरुवात आणि शेवट दोन्ही प्रदोष व्रताने होत आहे. अशातच जुलै महिन्यात असणारा अधिक श्रावण भगवान शिवशंकराचा महिना म्हणूनही पाहिला जातो. अशात जर तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल तर काही गोष्टी आहेत ज्या केल्यास तुम्हाला यश प्राप्ती होईल, तुमच्या कुटुंबात सुखसमृद्धी नांदेल.
ट्रेंडिंग न्यूज
आज शनिवार असल्याने या प्रदोषाला शनि प्रदोष असं म्हटलं जातं. चला जाणून घेऊ शनि प्रदोषाच्या दिवशी सुखसमृद्धी मिळवण्यासाठी कोणते उपाय करावे.
शनिप्रदोषाच्या दिवशी कोणते उपाय करावेत?
- शनि प्रदोष व्रताच्या दिवशी कोणत्याही गरजू व्यक्तीला अन्न आणि पाणी दान करावे. असे केल्याने व्यक्तीच्या कुटुंबात सुख-समृद्धी टिकून राहते.
- जर एखाद्याला व्यवसायात वारंवार निराशा येत असेल तर शनि प्रदोष व्रताच्या दिवशी काळ्या श्वानाला गोड भाकरी खायला द्या. या उपायाने तुमचे झोपलेले भाग्य जागे होईल.
- शनि प्रदोष व्रताच्या दिवशी छाया दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. म्हणूनच शनि प्रदोष व्रताच्या दिवशी एका भांड्यात मोहरीचे तेल घेऊन त्यात आपली सावली पाहा आणि हे तेल शनि मंदिरात दान करा. तेल दान करताना त्यात एक रुपयाचे नाणे टाकावे.
- व्यवसायात प्रगतीसाठी शनि प्रदोष व्रताच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर घोड्याची नाल लावा. असे केल्याने व्यवसायात प्रगती होईल.
- शनि प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर १०८ बेलपत्र अर्पण करा. असे म्हटले जाते की शनिवारी बेलपत्र अर्पण करणे खूप चांगलं असतं. आपली इच्छा असल्यास आपण उडीद डाळ, काळे बूट, काळे कपडे आणि शनिशी संबंधित वस्तू दान करू शकता. असे म्हणतात की असे केल्याने व्यक्तीवर शनिदेवाची विशेष कृपा राहते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या
विभाग