हिंदू धर्मात शनिदेवाची उपासना खूप फायदेशीर मानली जाते. शास्त्रात शनिदेवाला न्यायाचा देवता मानले जाते. शनिदेव कर्मांच्या आधारावर फळ देतात.
शनि जयंतीच्या दिवशी रविपुत्राची पूजा करण्याची परंपरा आहे. यावेळी शनि जयंती बुधवारी, ८ मे २०२४ रोजी वैशाख महिन्यात साजरी केली जाईल.
त्याचबरोबर ज्योतिष शास्त्रात या दिवसासंदर्भात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. या उपयांचे पालन केल्यास इच्छित वरदान मिळते, चला तर मग जाणून घेऊया, शनि जयंतीला करावयाचे उपाय.
ज्योतिष शास्त्रानुसार शनि जयंतीच्या दिवशी पिंपळाच्या झाडासमोर मोहरीच्या तेलाचे ५ दिवे लावा. यानंतर, त्याच्याभोवती ७ वेळा फेऱ्या मारा. या उपायाचा अवलंब केल्यास जीवनातील अचानक येणाऱ्या अडचणी दूर होतील. तसेच, ज्या घरगुती त्रासांचा तुम्ही खूप दिवसांपासून सामना करत आहात ते दूर होतील.
शनि जयंतीच्या दिवशी पिंपळाच्या झाडासमोर किंवा कोणत्याही शनि मंदिरात विधीनुसार शनिदेवाची पूजा करावी. यानंतर त्यांना मोहरीचे तेल अर्पण करावे. नंतर एका लयीत भक्तिभावाने शनि चालिसाचे पठण करा. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. तसेच कुंडलीतून अशुभ ग्रहांचा प्रभाव नाहीसा होतो.
शनि जयंतीला सावली दान करणे देखील खूप शुभ मानले जाते. हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम लोखंडाच्या भांड्यात मोहरीचे तेल आणि एक नाणे टाका. यानंतर त्या तेलात तुमचा चेहरा दिसल्यानंतर ती वाटी एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा शनि मंदिरात दान करा. असे केल्याने जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)े
संबंधित बातम्या