Shakambhari Navratri Puja Vidhi In Marathi : कुलदेवी, ग्रामदेवी, शक्तीपीठ आदी रूपांमध्ये देवीच्या विविध सगुण रूपांची उपासना केली जाते. हिंदु संस्कृतीमध्ये जितके महत्त्व देवाला आहे, तितकेच देवीलाही आहे. शारदीय नवरात्री, चैत्र नवरात्री, गुप्त नवरात्रीसह शाकंभरी नवरात्रोत्सवालाही तितकेच महत्व असून, यात शाकंभरी देवीची पूजा करण्याची परंपरा आहे.
वास्तविक, वर्षभरात चार नवरात्र मानल्या जातात, अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील शारदीय नवरात्र, चैत्र शुक्ल पक्षात येणारी चैत्र नवरात्र, माघ आणि आषाढ महिन्यात तिसरी आणि चतुर्थ नवरात्र साजरी केली जाते. परंतु तंत्र-मंत्राच्या अभ्यासकांसाठी विशेष मानली जाणारी शाकंभरी नवरात्र पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीपासून सुरू होते, ती पौष पौर्णिमेला संपते. समारोपाच्या दिवशी शाकंभरी जयंतीही साजरी केली जाते. तंत्र-मंत्र तज्ञांच्या दृष्टीने हे नवरात्र तंत्र-मंत्राच्या अभ्यासासाठी अतिशय योग्य मानले जाते.
पौष शुक्ल अष्टमीपासून पौष पौर्णिमेपर्यंत शाकंभरी नवरात्रोत्सव साजरा केला जातो. यंदा हा उत्सव ७ जानेवारी ते १३ जानेवारी दरम्यान साजरा केला जाणार आहे. प्रत्येक वर्षी पौष महिन्यात शाकंभरी देवीचा हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व पारंपरिक उत्साहाने साजरा केला जातो.
शाकंभरी नवरात्रीच्या दरम्यान, भक्त विशेषत: देवीला ताजी फळे, भाज्या आणि पालेभाज्या अर्पण करतात, असे केल्याने भक्तांना देवीआईचा आशीर्वाद मिळतो.
या दिवशी भाविक वनस्पतींची देवी शाकंभरीची पूजा करतील. माता शाकंभरीने आपल्या शरीरातून निर्माण झालेल्या भाज्या, फळे, मुळे इत्यादींनी जगाचे पोषण केले होते. त्यामुळे आई 'शाकंभरी' या नावाने प्रसिद्ध झाली. या मातांना माता अन्नपूर्णा, वैष्णो देवी, चामुंडा, कांगडा वाली, ज्वाला, चिंतापूर्णी, कामाख्या, चंडी, बाला सुंदरी, मानसा आणि नैना देवी देखील म्हणतात.
पौष शुक्ल अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत शाकंभरी देवीची पूजा करावी.
सकाळी लवकर उठा, आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला.
पूजेचे ठिकाण स्वच्छ करून लाल कपडा पसरवा आणि माँ शाकंभरीची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा.
ताजी फळे आणि हंगामी भाज्या माँ शाकंभरीभोवती ठेवा.
गंगाजल शिंपडून पूजा सुरू करा.
सर्वप्रथम श्रीगणेशाची पूजा करावी.
माता शाकंभरीची कथा, चालीसा, स्तुती इत्यादी पठण करा.
माता शाकंभरीला मिठाई, फळे, भाज्या, हलवा-पुरी, सुका मेवा इत्यादी अर्पण करा.
माता शाकंभरीच्या मंत्रांचा जप करा.
आरती करावी.
बोलताना शब्द जपून वापरावे, कोणाचाही अपमान होईल असे वर्तन करू नये.
नवरात्रीच्या नऊ दिवसात चामड्याच्या वस्तूंचा वापर टाळावा.
व्रत करणाऱ्या व्यक्तींनी ब्रह्यचर्य पाळावे.
उपवास करणाऱ्या व्यक्तीनं मांस, दारू आणि तामसिक पदार्थांचं सेवन टाळावं.
संबंधित बातम्या