Lakshmi Pujan befor Diwali: दिवाळीच्या सणाला आता अवघे काही दिवस उरले आहेत, अशा परिस्थितीत तुम्ही दिवाळीपूर्वी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही ज्योतिषीय उपाय करून पाहू शकता. हिंदू धर्मात, माता लक्ष्मीला संपत्ती, वैभव आणि ऐश्वर्य प्रदान करणारी देवी मानली जाते. दिवाळीपूर्वी हे ज्योतिषीय उपाय केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते. तुमची संपत्तीही वाढते आणि अडकलेला पैसाही वसूल होतो. दिवाळीपूर्वी करावयाचे हे उपाय अतिशय सोपे आहेत आणि कोणत्याही त्रासाशिवाय करून पाहता येतात. जाणून घेऊया दिवाळीपूर्वी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावेत...
शुक्रवारचा दिवस हा लक्ष्मीमातेचा दिवस मानला जातो. म्हणून दिवाळीपूर्वी येणाऱ्या शुक्रवारी व्रत ठेवून माता लक्ष्मीची पूजाअर्चा करावी. या दिवशी शुभ्र वस्त्रं धारण करावीत. तसेच पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा भोग देखील चढवावा. दिवाळीपूर्वी येणाऱ्या शुक्रवारी व्रत केल्याने धनाची आणि समृद्धीची प्राप्ती होते, तसेच धनसंपत्ती वाढते अशी मान्यता आहे.
दिवाळीपूर्वी दररोज दक्षिणावर्ती शंखात पाणी भरून संपूर्ण घरात त्याने शिडकावा करावा. असे करणे अत्यंत शुभ असल्याचे मानले जाते. असे केल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू होतो. या बरोबरच दररोज स्फटिकमालेद्वारे माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप अवश्य करा. ही माला धनप्राप्ती आणि समृद्धीसाठी प्रभावी असल्याचे मानले गेले आहे.
माता लक्ष्मी नेहमीच स्वच्छ स्थानीच निवास करत असते. म्हणून घराची रोजच्या रोज स्वच्छता ठेवा, साफसफाई करा, तसेच गंगाजलाचा शिडकावा करा. याबरोबरच रोज स्नान करून पाण्यात हळद मिसळून स्नान केल्याने लक्ष्मीमातेची कृपा तुमच्यावर नेहमीच राहील. स्नान केल्यानंतर गायत्री मंत्र किंवा महालक्ष्मी मंत्राचा जप करावा. असे केल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तसेच धन येत राहते.
शुक्रवारच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान आणि ध्यान आटोपल्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या स्थानी काळ्या हळदीवर सिंदूर लावा आणि गुग्गूळ धूप दाखवा. नंतर चांदीचे शिक्के कपड्यात लपेटून कपाट, तिजोरी अशा धनाच्या स्थानी तसेच घराच्या मुख्य प्रवेशदारावर टांगून ठेवा. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि घरात धन देखील येऊ लागते.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या