Good Morning Message In Marathi: जेव्हा कोणी प्रेमाने सुप्रभात म्हणतो तेव्हा दिवसाची सुरुवात अधिक छान होते. शुभ सकाळच्या शुभेच्छा दिल्याने समोरच्या व्यक्तीमध्ये ऊर्जा निर्माण होते. आजकाल, बरेच लोक सुप्रभात म्हणण्यासाठी आश्चर्यकारक आणि सुंदर संदेश शोधतात. तुम्ही देखील गुड मॉर्निंग संदेश शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. येथे तुम्हाला १० सर्वोत्तम संदेश सापडतील, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या प्रियजनांना सुप्रभात म्हणू शकता. चला तर मग पाहूया...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा…
आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात
गणपती दर्शनाने करूया…
जिव्हाळायाचे ऋणानुबंध
असल्याशिवाय कोणी कोणाच्या
आयुष्यात येत नाही.
सोन्याचा साठा करुन मिळालेल्या
श्रीमंतीपेक्ष्या तुमच्या सारखा सोन्याहून
मुल्यवान माणसांचा साठा ज्यांच्याकडे आहे ते खरे श्रीमंत…
शुभ सकाळ
मोगरा कुठे ठेवला तरी सुगंध
हा येणारच, आणि आपली
माणसे किती लांब असली
तरी आठवण ही येणारच…
शुभ सकाळ
थंडी क्षणांची पण गारवा कायमचा,
ओळख क्षणांची पण आपुलकी कायमची,
भेट क्षणांची पण नाती आयुष्यभराची,
सहवास क्षणांचा पण ओढ कायमची,
हीच खरी नाती मनांची,
सकाळच्या सुंदर शुभेच्छा.
रात्र ओसरली दिवस उजाडला,
तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला,
चिलमील किरणांनी झाडे झळकली,
सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली.
शुभ प्रभात!
जी माणसे “दुसऱ्याच्या” चेहऱ्यावर,
आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,
ईश्वर “त्यांच्या” चेहऱ्यावरचा आनंद,
कधीच कमी होऊ देत नाही..
शुभ सकाळ!
आनंदाने फुलवुया जीवनाचा,
सुंदर मळा..
सद्विचारांच्या रंगाने रंगवुया,
मनाचा फळा..
शुभ सकाळ!
पाणी धावतं म्हणून त्याला “मार्ग” सापडतो,
त्या प्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची,
सुखाची, आनंदाची वाट सापडतेच…
शुभ सकाळ!
सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात,
नाजूक उन्हाची प्रेमळ साद,
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ.
सुप्रभात!
संबंधित बातम्या