Sarvapitri Amavasya : सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; कधी आणि कसे कराल श्राद्ध विधी जाणून घ्या-sarvapitri amavasya and surya grahan 2024 how to perform shraddha rituals for solar eclipse ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Sarvapitri Amavasya : सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; कधी आणि कसे कराल श्राद्ध विधी जाणून घ्या

Sarvapitri Amavasya : सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; कधी आणि कसे कराल श्राद्ध विधी जाणून घ्या

Sep 30, 2024 02:21 PM IST

Sarvapitri Amavasya and Surya Grahan 2024 : सर्वपित्री अमावस्येला सर्व पितरांचे श्राद्ध केले जाते, परंतु यावेळी अमावस्येला सूर्यग्रहण आहे, अशा स्थितीत पितरांचे श्राद्ध विधी केव्हा आणि कसे करणे योग्य ठरेल, हे जाणून घ्या.

सर्वपित्री अमावस्या आणि सूर्यग्रहण २ ऑक्टोबर २०२४
सर्वपित्री अमावस्या आणि सूर्यग्रहण २ ऑक्टोबर २०२४

सर्व पितृ अमावस्या २ ऑक्टोबर २०२४ रोजी आहे. हा दिवस पितरांच्या श्राद्धविधीसाठी सर्वात महत्वाचा मानला जातो. या दिवशी केलेले तर्पण आणि पिंडदान पितरांना मोक्ष प्रदान करतात आणि त्यांच्या आत्म्याला संतुष्ट करतात.

या अमावस्याला 'महालय अमावस्या' किंवा 'पितृ अमावस्या' असेही म्हणतात. पितृ पक्षाचा हा शेवटचा दिवस आहे. हिंदू धर्मात भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला विशेष महत्त्व आहे. विशेषतः पितृ तर्पण, श्राद्ध आणि पितरांसाठी केले जाणारे विधी यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी श्राद्ध आणि तर्पण केल्याने पितरांची कृपा प्राप्त होते. पुराणात असे म्हटले आहे की सर्वपितृ अमावस्येला केलेले तर्पण पितरांना मोक्ष प्राप्त करून देते आणि त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करते.

या तिथीला ज्या पितरांची तिथी त्यांच्या कुटुंबीयांना माहीत नाही किंवा ज्यांचे श्राद्ध तर्पण काही कारणास्तव पृथ्वी पक्षाच्या १५ दिवसांत करता येत नाही, ते या अमावस्येला त्यांचे श्राद्ध तर्पण करतात. याच दिवशी या वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण होणार असून, श्राद्ध विधी कसे करावे जाणून घ्या.

सूर्यग्रहणाची वेळ

सूर्यग्रहण प्रारंभ - १ ऑक्टोबर २०२४, रात्री ९ वाजून ४० मिनिटे.

सूर्यग्रहण समाप्ती - २ ऑक्टोबर २०२४, सकाळी ३ वाजून १७ मिनिटे.

सर्वपित्री अमावस्येला होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे या ग्रहणाचा सुतक कालावधी वैध राहणार नाही. अशा स्थितीत तुम्ही या दिवशी श्राद्ध विधी कुठलीही शंका न आणता करू शकतात.

सर्वपित्री अमावस्येला हे करा

सर्वपितृ अमावस्या पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची, त्यांचे श्राद्ध करण्याची आणि आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर चालण्याची संधी देते. या दिवशी लोक पिंडदान आणि तर्पण आपल्या पूर्वजांना पाणी, तीळ, फुले आणि पवित्र विधीद्वारे अर्पण करतात. या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान आणि दान अर्पण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. असे म्हटले जाते की, या दिवशी गरीबांना अन्नदान करणे आणि वस्त्र दान केल्याने पितरांच्या आत्म्याला तृप्ती मिळते आणि काही लोक या दिवशी भगवान विष्णू किंवा शिवाची पूजा करतात.

गरुड पुराण आणि श्रीमद भागवत महापुराणानुसार श्री हरी आणि पूर्वज पिंपळात राहतात अशी मान्यता आहे. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घालून पूजा करावी, यामुळे पितृदोष दूर होतो. नदीच्या काठावर आणि पिंपळाच्या झाडाखाली श्राद्ध विधी करणे देखील उत्तम मानले जाते. यामुळे पितरांना पाणी आणि अन्न सहजतेने सेवन करता येते. तसेच, पितृ पक्षात पिंपळाच्या लाकडाने हवन करावे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो.

Whats_app_banner
विभाग