Saphala Ekadashi 2024 In Marathi : प्रत्येक कृष्ण व शुक्ल पक्षात एकादशी तिथी येते. ही तिथी भगवान विष्णूंना समर्पीत असून, एकादशी तिथीचे व्रत भक्तिभावाने केले जाते. डिसेंबर महिन्यात येणारी दुसरी एकादशी सफला एकादशी म्हणून ओळखली जाईल. पौष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशीला सफला एकादशी साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाईल. श्रीहरीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस खूप खास आणि महत्वाचा मानला जातो. मान्यतेनुसार सफला एकादशीचे व्रत केल्याने जीवनातील क्लेश दूर होतात. चला तर मग जाणून घेऊया सफला एकादशीची नेमकी तिथी, शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि उपवासाची वेळ-
यावर्षी सफला एकादशी २६ डिसेंबर २०२४ रोजी साजरी केली जाणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, एकादशी तिथी २५ डिसेंबर रोजी रात्री १० वाजून २९ मिनिटांनी सुरू होईल आणि २७ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजून ४३ मिनिटांनी संपेल.
तिथी प्रारंभ - २५ डिसेंबर २०२४ रात्री १० वाजून २९ मिनिटे
एकादशी तिथी समाप्ती - २७ डिसेंबर २०२४ रोजी रात्री १२ वाजून ४३ मिनिटे
पारण (उपवास सोडणे) वेळ - २७ डिसेंबर सकाळी ७ वाजून १२ मिनिट ते ९ वाजून १६ मिनिट
द्वादशी तिथीला पारण समाप्तीची वेळ - २८ डिसेंबर २ वाजून २६ मिनिटे
पंचांगानुसार, २६ डिसेंबर २०२४ रोजी सफला एकादशीला सुकर्म योग तयार होत आहे, ज्याची समाप्ती रात्री १० वाजून २३ मिनिटांनी होईल. तसेच सफला एकादशीला स्वाती नक्षत्रही तयार होईल, जे ६ वाजून ९ मिनिटांपर्यंत राहिल. या दिवशी अभिजित मुहूर्त दुपारी १२ वाजून १ मिनिटे ते १२ वाजून ४२ मिनिटापर्यंत आहे.
स्नान करून मंदिराची स्वच्छता करा. भगवान श्री हरि विष्णूचा अभिषेक गंगाजलासह पंचामृताने करावा. आता भगवंताला पिवळे चंदन व पिवळी फुले अर्पण करावीत, मंदिरात तुपाचा दिवा लावावा, शक्य असल्यास उपवास ठेवावा व उपवास करण्याचा संकल्प करावा, सफला एकादशीची व्रतकथा वाचावी, “ॐ नमो भगवते वासुदेवाय नम: ” या मंत्राचा जप करावा, भगवान श्री हरी, विष्णू आणि लक्ष्मीची आरती पूर्ण भक्तीभावाने करावी, तुळशीने भगवंताला भोग अर्पण करावा, शेवटी क्षमा प्रार्थना करावी.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या