Sant Tukaram Maharaj Jayanti : संत तुकाराम महाराज हे सतराव्या शतकातील वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते. त्यांचा जन्म देहू येथे माघ शुद्ध पंचमीला, अर्थात वसंत पंचमीला ( सोमवार, दिनांक २१ जानेवारी १६०८) झाला. संत तुकाराम यांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात. संत तुकाराम यांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे) असे आहे. महाराजांच्या आईचे नाव कनकाई बोल्बोबा अंबिले आहे. तर पत्नीचे नाव आवली असे आहे. महाराजांना महादेव, विठोबा, नारायण आणि भागूबाई अशी अपत्ये होती. केशवचैतन्य (बाबाजी चैतन्य) हे संत तुकाराम महाराजांचे गुरु होत. तर महाराजांचे शिष्य संत निळोबा, संत बहिणाबाई आणि संत भगवानबाबा हे होते. त्यांनी रचना केलेले अभंग तुकारामाची गाथा या ग्रंथात समाविष्ट आहे. यात ५ हजारांवर अभंग आहेत. आज त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊ या. तुम्ही देखील हे शुभेच्छा संदेश आपले आप्तेष्ट, मित्र आणि प्रियजनांना पाठवू शकता.
जे का रंजले गांजले! त्यांसी म्हणे जो आपुले
तोचि साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा!
संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा
संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
दया, क्षमा, शांती।
तेथे देवाती वस्ती।।
संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
सुख पाहता जवापाडे
दु:ख पर्वताएवढे
संत तुकाराम महाराज यांच्या
जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन!
बोले तैसा चाले।
त्याची वंदावी पाऊले।।
संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त
विनम्र अभिवादन
शुध्द बीजापोटी ।
फळे रसाळ गोमटी ।।
संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
साधु-संत येती घरा ।
तोचि दिवाळी दसरा।।
संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
अज्ञानाच्या पोटी ।
अवघीच फजिती।।
संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
माणसाने थोडातरी परोपकार करावा.
संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला करावी लागत नाही.
संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन!
सत्य आणि असत्याचा शोध घेणाऱ्यांनी आपल्या मनाचा कौल मानावा.
संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
बहुमत चुकीचे असल्यास कधीही स्वीकारू नये.
संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
चांगले मित्र हेच भाग्याचं लक्षण.
संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
संबंधित बातम्या