Sant Ravidas Jayanti Wishes : संत रविदास जयंतीच्या शुभेच्छा आणि प्रेरणादायी विचार
मराठी बातम्या  /  धर्म  /  Sant Ravidas Jayanti Wishes : संत रविदास जयंतीच्या शुभेच्छा आणि प्रेरणादायी विचार

Sant Ravidas Jayanti Wishes : संत रविदास जयंतीच्या शुभेच्छा आणि प्रेरणादायी विचार

Published Feb 12, 2025 09:48 AM IST

Sant Ravidas Jayanti 2025 Wishes : जीवनात सामाजिक समता, बंधुत्व आणि भक्तीचा संदेश देणारे संत रविदास यांची आज १२ फेब्रुवारी २०२५ रोजी माघ पौर्णिमेला जयंती आहे. तुमच्या प्रियजनांना संत रविदास यांचे प्रेरणादायी विचार पाठवून त्यांना प्रेरित करण्यात मदत करूया, आणि संत रविदास जयंतीच्या शुभेच्छा देऊया.

संत रविदास जयंतीच्या शुभेच्छा
संत रविदास जयंतीच्या शुभेच्छा

Sant Ravidas Jayanti : या वर्षी संत रविदास यांची ६४८ वी जयंती १२ फेब्रुवारी २०२५ रोजी माघ पौर्णिमेला साजरी केली जात आहे. रविदासांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील जातीय भेदभाव दूर करण्यासाठी आणि समाजसुधारणा आणि समाज कल्याण कार्यासाठी समर्पित केले. या दिवशी त्यांचे अनुयायी अनेक धार्मिक विधी, कीर्तन आणि यात्रा करतात.

रविदास यांना रायदास, रोहिदास आणि रुहिदास असेही म्हणतात. रविदास यांनी आपल्या जीवनात सामाजिक समता, बंधुत्व आणि भक्तीचा संदेश दिला. त्यांनी जातिव्यवस्थेचा विरोध करून मानवतेचा संदेश दिला. त्यांच्या रचनांमध्ये ईश्वरभक्ती, मानवतावाद आणि सामाजिक न्याय यांचा समावेश आहे. त्यांच्या काही रचना गुरु ग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट आहेत, ज्यामुळे त्यांना शीख धर्मातही महत्त्वाचे स्थान मिळाले आहे.

महान संत, कवी, तत्त्वज्ञानी आणि समाजसुधारक संत गुरू रोहिदास यांनी आपल्या जीवनात आचरण शुद्धतेवर सर्वाधिक भर दिला. त्यांनी धर्माच्या नावावर पसरवल्या जाणाऱ्या अंधश्रद्धा आणि अवडंबरावर कडाडून टीका केली. त्यांनी आपल्या शिकवणी आणि प्रवचनातून लोकांच्या जीवनाला नवी प्रेरणा दिली आहे. संत रविदास जयंतीनिमित्त तुमच्या प्रियजनांना संत रविदास यांचे प्रेरणादायी विचार पाठवून त्यांना प्रेरित करण्यात मदत करूया, आणि संत रविदास जयंतीच्या शुभेच्छा देऊया.

संत रविदास जयंतीच्या शुभेच्छा आणि प्रेरणादायी विचार -

मन ही पूजा मन ही धूप,

मन ही सेऊं सहज स्वरूप।।

मन शुद्ध ठेवा, अशा मनात

देव नेहमी वास करतो.

संत रविदास जयंतीच्या शुभेच्छा

आपण चांगले करू शकत नसल्यास,

किमान इतरांचे नुकसान करू नका.

जर फुले बनवता येत नाहीत,

तर निदान काटा बनू नका.

संत रविदास जयंतीच्या शुभेच्छा

 

‘मन चंगा तो कठौती में गंगा’

मन शुद्ध असेल तर गंगा मातेलाही बोलावता येते.

कोंडीत येतो. ही देवाची कृपा आहे.

संत रविदास जयंतीच्या शुभेच्छा

कोणताही माणूस त्याच्या जन्मामुळे लहान किंवा मोठा नसतो.

तर तो स्वत:च्या कर्मामुळे घडतो.

संत रविदास जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

"रैदास कहै जाकै हदै,

रहे रैन दिन राम,

सो भगता भगवंत सम,

क्रोध न व्यापै काम",

गुरू रोहिदास म्हणतात, की ज्याच्या हृदयात दिवसरात्र रामनाम असतं, असा भक्त भगवान श्रीरामासमान असतो. रामनामाची जादू अशी आहे, की त्याचा दिवसरात्र जप करणाऱ्या व्यक्तीला कधीच राग येत नाही आणि त्याच्या मनात कधीच प्रबळ कामवासना निर्माण होत नाही.

संत रविदास जंयतीनिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा

Priyanka Chetan Mali

TwittereMail

प्रियंका माळी ही हिंदुस्तान टाइम्स -मराठीमध्ये कन्टेन्ट रायटर असून ती राशीभविष्य, अंक ज्योतिष, टॅरो कार्ड, पंचांग, धार्मिक विषयांचा अभ्यास करून योग्य ती अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहचवत असते. प्रियंकाने बी कॉम आणि पत्रकारिता डिप्लोमा कोर्स केला असून ती ५ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. एका स्थानिक मीडिया चॅनलमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून प्रियंकाने करिअरची सुरूवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स (डिजिटल) मध्ये भविष्य सेक्शनसाठी कन्टेन्ट रायटर म्हणून २ वर्ष काम केले आहे. प्रियंकाला फावल्या वेळेत वाचन करण्याची आणि कविता लिहिण्याची आवड आहे.

Whats_app_banner