मराठी बातम्या  /  धर्म  /  धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा... संत निवृत्तिनाथ पुण्यतिथीनिमित्त करा विनम्र अभिवादन

धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा... संत निवृत्तिनाथ पुण्यतिथीनिमित्त करा विनम्र अभिवादन

Jul 03, 2024 09:38 AM IST

Sant Nivruttinath Maharaj Punyatithi 2024 : आज संत निवृत्तिनाथ यांची पुण्यतिथी असून, सकाळी १० ते १२ वाजे दरम्यान संत निवृत्तिनाथ महाराज समाधी सोहळा साजरा होईल. संत निवृत्तिनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करा.

संत निवृत्तिनाथ महाराज पुण्यतिथी
संत निवृत्तिनाथ महाराज पुण्यतिथी

संत निवृत्तिनाथ यांना वारकरी संप्रदायाचे आद्य गुरु मानले जाते. प्रसिद्ध नवनाथांपैकी एक असलेले संत निवृत्तिनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे मोठे भाऊ आणि गुरु होते. नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तिनाथांना दीक्षा दिली. बुधवार ३ जुलै संत निवृत्तीनाथ यांची पुण्यतिथी साजरी केली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

निवृ​त्तिनाथांचे जन्मवर्ष १२७३ ​किंवा १२६८ असे सां​गितले जाते. ज्ञानेश्वर, सोपानदेव मुक्ताई, निवृत्तिनाथ ह्या चार भावंडांमधे निवृत्तिनाथ हे थोरले होते. निवृ​त्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरू होते. संत निवृत्तिनाथ महाराजांनी वारकरी संप्रदायातील शैव आणि वैष्णव यांच्यामधील भेदभाव नष्ट केला होता. आपल्या भावंडांच्या समाधीनंतर सद्गुरू निवृत्तिनाथ यांनी शके १२१८ मधील ज्येष्ठ कृ. त्रयोदशी या दिवशी १७ जून १२९७ रोजी त्र्यंबकेश्‍वर येथे संजीवन समाधी घेतली.

बुधवार १७ तारखेला आषाढी एकादशी असून, आषाढी वारी सुरू झाली आहे. सर्व वारकरी भक्तीमय झाले आहे आणि पंढरपूरच्या दिशेने चालू लागले आहे. संगती टाळ-मृदुंगाची साथ आहे. पंढरपूर यात्रा आणि आषाढी एकादशीनिमित्त सर्व संताच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने जाऊ लागल्या आहेत. या यात्रे दरम्यान आज ३ जुलै रोजी सकाळी १० ते १२ वाजे दरम्यान संत निवृत्तिनाथ महाराज समाधी सोहळा होईल. संत निवृत्तिनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करा.

धन्य धन्य निवृत्ती देवा,

काय महिमा वर्णावा ।।

संत निवृत्तिनाथ महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त त्रिवार वंदन

संत निवृत्ती आले ज्ञान दाना । पावन केले तेणे जगी जीवना ।

भक्तिपथ दिधले वैष्णव जना । धन्य धन्य निवृत्तीनाथ ।।

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांना पुण्यतिथी निमित्त त्रिवार वंदन

संत निवृत्ती आले ज्ञान दाना,

पावन केले तेणे जगी जीवना,

भक्तिपंथ दिधले वैष्णव जना,

धन्य निवृत्तिनाथा,

संत निवृत्तिनाथ महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम.

निवृत्तिचे ध्येय कृष्ण हाचि होय ।

गयिनीनाथे सोय दाखविली ।।

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

रूपाचें रूपस विठ्ठलनामवेष ।

पंढरीनिवास आत्माराम ॥ १ ॥

पुंडलिकभाग्य वोळलें संपूर्ण ।

दिननिशीं कीर्तन विठ्ठल हरी

संत निवृत्तिनाथ महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

..

पुंडलीकपेठ वैष्णवाचा हाट ।

करिती बोभाट हरिनामाचा

निवृत्ति निर्वाळिला ज्ञानदेव सोपान ।

खेचर तल्लीन वीनटला

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...!

WhatsApp channel
विभाग