Krikrant 2025 : संक्रांत करिदिन कसा साजरा करतात? जाणून घ्या या दिवशी काय करावे आणि काय करू नये
मराठी बातम्या  /  धर्म  /  Krikrant 2025 : संक्रांत करिदिन कसा साजरा करतात? जाणून घ्या या दिवशी काय करावे आणि काय करू नये

Krikrant 2025 : संक्रांत करिदिन कसा साजरा करतात? जाणून घ्या या दिवशी काय करावे आणि काय करू नये

Jan 15, 2025 09:49 AM IST

Sankrant Karidin 2025 : भोगी व मकर संक्रांत नंतर संक्रांत करिदिन सण साजरा केला जातो. संक्रांती नंतरचा दुसरा दिवस क्रिक्रांत म्हणून साजरा करतात. जाणून घ्या यादिवशी काय करावे आणि काय करू नये ते.

संक्रांत करिदिन
संक्रांत करिदिन

मकर संक्रांती सण हा मोठ्या उत्साहात साजरा होतो. तीळगुळ देऊन तीळगुळ घ्या गोड गोड बोला या शुभेच्छांनी वर्षाची सुरवात केली जाते. महिलांसाठी हा उत्सव विशेष महत्वाचा असतो कारण या दिवशी वाण देऊन हळदी-कुंकवाचा कार्यक्रम साजरा करतात. नवीन वर्षातील पहिलाच सण असल्यामुळे अनेकांनी उत्साहात पतंगबाजीचा आनंदही लुटला जातो.

मकर संक्रांतीचा दुसरा दिवस संक्रांत करिदिन म्हणून साजरा करतात. बुधवार १५ जानेवारी २०२५ रोजी पौष कृष्ण द्वितीया दिवस किक्रांत म्हणजेच करिदिन म्हणून साजरा केला जात आहे. ह्या दिवशी चांगले किंवा कोणतेही शुभ काम करीत नाहीत असे सांगितले जाते.

भोगी व मकर संक्रांत नंतर संक्रांत करिदिन सण साजरा केला जातो. संक्रांती नंतरचा दुसरा दिवस क्रिक्रांत म्हणून साजरा करतात. जाणून घ्या यादिवशी काय करावे आणि काय करू नये ते.

संक्रांत करिदिनला काय करावे -

पंचागात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला असतो. या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करतात. या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये, भोगीच्या दिवशीची शिळी भाकरी राखून ती खावी, केरकचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी, दुपारी हळदी-कुंकू करावे अशा काही प्रथा महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात.

दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस 'मट्टू पोंगल' म्हणून साजरा करतात. या दिवशी गाई-बैलांना स्नान घालून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात. त्यांच्या शिंगाना बेगड लावून त्यांना सजवतात. गुरांना दुपारी गोडधोड जेवण घालून दिवसभर त्यांना मोकळे सोडतात. संध्याकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढून नृत्य गायनाचा कार्यक्रमही केला जातो.

संक्रांत करिदिनला काय करू नये -

या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये. लांबचा प्रवास टाळावा. घरात वादविवाद टाळा, मन शांत ठेवा. सर्वांशी आदराने वागा. केर काढण्यापूर्वीच केस विंचरा, कुलदैवताची आणि देवाची पूजा करावी, तसेच नामस्मरण करावे असे सांगितले जाते.

संक्रांत करिदिनची कथा -

फार वर्षापुर्वी संकारसुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांतीदेवीने संकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले. आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. पंचागात हा दिवस संक्रांत करिदिन म्हणून दाखवलेला असतो.

Whats_app_banner