Happy Sankashti Chaturthi In Marathi : हिंदू मान्यतेनुसार कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी श्रीगणेशाची पूजा केल्याने त्या कामात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होत नाही. या नवीन वर्षात संकष्टी चतुर्थी ज्याला तीळ चौथ देखील म्हणतात, १७ जानेवारी रोजी साजरा केला जाईल. या शुभ दिवशी गणेश आणि चंद्र देवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे.
पंचांगानुसार पौष महिन्याची कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी १७ जानेवारीला पहाटे ४ वाजून ०६ मिनिटांनी सुरू होत आहे. चतुर्थी तिथी १८ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजून ३० मिनिटांनी समाप्त होईल. अशा स्थितीत उदया तिथी लक्षात घेऊन संकष्टी चतुर्थीचे व्रत शुक्रवार, १७ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, हे व्रत पाळल्याने मुलांसाठी दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि प्रगतीचे आशीर्वाद प्राप्त होतात.
संकष्टी चतुर्थीच्या व्रतानिमित्त लोक विधिवत पूजा करण्याबरोबरच आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देतात. तुम्ही देखील नवीन वर्षाच्या पहिल्या संकष्ट चतुर्थीला या शुभेच्छा देऊन दिवस मंगलमय करू शकतात.
एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,
तन्नो दंती प्रचोदयात्
महाकर्णाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,
तन्नो दंती प्रचोदयात्
संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा
…
संकष्ट चतुर्थीची सकाळ
तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो
गणपती बाप्पा तुम्हाला सदैव आशीर्वाद देवो
संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
…
संकष्टी चतुर्थीनिमित्त आपणा सर्वांना आणि
आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या मनातील इच्छित कामना
श्रीगणरायाकडून पूर्ण होवोत हीच प्रार्थना!
…
तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा…
संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा
…
पाहूनी ते गोजिरवाणं रूप
मोह होई मनास खूप
ठेवण्या तुज हाती मोदक प्रसाद
होते सदैव दर्शनाची आस –
संकष्टी चतुर्थी बनवा खास
संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा
…
वंदितो तुज चरण
आर्जव करतो गणराया
वरदहस्त असूद्या माथी
राहूद्या सदैव छत्रछाया
गणपती बाप्पा मोरया
संकष्ट चतुर्थीच्या मन:पूर्वक शुभेच्छा
…
तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता,
विघ्नविनाशक मोरया
संकटीरक्षी शरण तुला मी
गणपती बाप्पा मोरया
संकष्ट चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा.
…
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
संकष्ट चतुर्थी निमित्त शुभेच्छा
संबंधित बातम्या