गणपती बाप्पाची पूजा केल्याशिवाय शुभ कार्य आणि कोणतीही पूजा होऊ शकत नाही. प्रत्येक शुभ कार्याच्या सुरवातीला गणपती बाप्पाची पूजा केली जाते. प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात. एक शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी आणि दुसरी कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी. विघ्न, संकटे, अडथळे दूर करण्यासाठी नेहमी गणेशाच्या चरणी साकळं घातलं जातं. गणपती बाप्पा प्रत्येकाची विघ्न हरतो.
या वर्षीची ऑक्टोबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी रविवार २० तारखेला साजरी केली जाईल. संकष्ट चतुर्थी २० ऑक्टोबरला सकाळी ६ वाजून ४६ मिनिटांनी सुरु होईल तर दुसऱ्या दिवशी २१ ऑक्टोबरला सकाळी ४ वाजून १६ मिनिटांनी संपेल. उदया तिथीनुसार २० तारखेला संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जाईल.
गणपती बाप्पाची पूजा-पाठ करणारा हा खास दिवस प्रत्येक जण सोशल मीडियावर व्हॉट्सअप स्टेटस, फेसबूक स्टेट्स किंवा एकमेकांना मॅसेजेस पाठवून शुभेच्छा देतात. तुम्ही प्रियजणांना हे हटके शुभेच्छा पाठवून दिवस आणखी खास करू शकतात.
वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ: |
निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा||
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!
सर्व गणेशभक्तांना संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा!
…
आज श्रीगणेशाची आराधना केल्याने
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत..
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!
…
सकाळ हसरी असावी,
बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी
मुखी असावे बाप्पाचे नाम,
सोपे होईल सर्व काम
संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा
…
संकटांवर मात करणारा गणपती तुम्हाला यश देवो,
तुमच्या आयुष्यात आनंद आणो आणि दुःख दूर करो..
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!
…
भक्ति गणपती,
शक्ति गणपती
सिद्धी गणपती,
लक्ष्मी गणपती
महागणपती..
संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!
…
कितीही मोठी समस्या असू दे,
विघ्नहर्त्याच्या नावातच समाधान आहे..
संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!
…
रम्य ते रूप सगुण साकार,
मनी दाटे भाव पाहता क्षणभर
अंतरंगी भरूनी येत असे गहिवर,
विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर..
संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!
…
तुमचे सामर्थ्य, बुद्धिमत्ता आणि ज्ञान वाढू दे..
विघ्न दूर करण्यासाठी बळ मिळू दे..
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!
…
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती,
आरोग्य आपणांस लाभो;
ही गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना,
संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!
…
वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला,
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी सर्व गणेशभक्तांना,
संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!