प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी गणेशाच्या पूजेला खूप महत्त्व आहे. याच्या साह्याने गणपती बाप्पा आपल्या भक्तांचे सर्व दु:ख दूर करून त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
अशा या खास दिवशी तुम्ही तुमच्या प्रियजनांना खास पद्धतीने शुभेच्छा देऊ शकता. यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही खास संदेश घेऊन आलो आहोत, हे मेसेज तुमच्या प्रियजनांना पाठवून त्यांचा दिवस आनंदमय करू शकता.
पंचांगानुसार, भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी २० सप्टेंबर रोजी रात्री ९:१५ वाजता सुरू होईल आणि २१ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ६:१३ वाजता संपेल. त्यामुळे उदया तिथीनुसार २१ सप्टेंबर रोजी पितृ पक्षातील संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे. या दिवशी हर्षण योगाचाही योगायोग आहे. शुभ कार्यासाठी हर्षण योग सर्वोत्तम मानला जातो. २१ सप्टेंबर रोजी सकाळी ११:३६ ते २२ सप्टेंबर रोजी सकाळी ८:१८ पर्यंत हर्षण योग राहील.
१) ओम गं गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया.. संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
२) रम्य ते रूप सगुण साकार, मनी दाटे भाव पाहता क्षणभर अंतरंगी भरूनी येत असे गहिवर, विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर.. आज संकष्ट चतुर्थी…. सर्व गणेशभक्तांना, संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा…
३) तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य आपणांस लाभो; ही गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना, संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!
४) सकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी मुखी असावे बाप्पाचे नाम, सोपे होईल सर्व काम
५) आज श्रीगणेशाची आराधना केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.. संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!
६) भक्ति गणपती, शक्ति गणपती सिद्धी गणपती, लक्ष्मी गणपती महागणपती.. संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!
७) कितीही मोठी समस्या असू दे, देवा तुझ्या नावातच समाधान आहे.. संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!
८) आजच्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण होवोत या सदिच्छा!
९ ) संकष्ट चतुर्थीच्या मंगलदिनी तुमच्या मनोकामन पूर्ण होऊ द्या! संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!