मराठी बातम्या  /  धर्म  /  Sankashti Chaturthi : वर्षाची पहिली संकष्ट चतुर्थी शोभन योगात, जाणून घ्या शहराप्रमाणे चंद्रोदय वेळ

Sankashti Chaturthi : वर्षाची पहिली संकष्ट चतुर्थी शोभन योगात, जाणून घ्या शहराप्रमाणे चंद्रोदय वेळ

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 28, 2024 05:18 PM IST

sankashti chaturthi chandrodaya timing : उद्या २९ जानेवारी २०२४ सोमवार रोजी, या वर्षाची पहिली संकष्ट चतुर्थी आहे. या दिवशी शोभन योगासह अनेक शुभ योग संयोग घडत आहेत. शहराप्रमाणे चंद्रोदय वेळ जाणून घ्या व गणपती बाप्पाची आरती म्हणा.

sankashti chaturthi january 2024
sankashti chaturthi january 2024

गणपती बाप्पा सर्वांचे लाडके देवता आहे. बुद्धीदाता, विघ्नहर्ता अशा गणपती बाप्पाच्या नामस्मरणारा आणि पूजनाला खास महत्व आहे. सर्व देवतांच्या आधी पूजनीय अशा बाप्पासाठी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला व्रत करण्याची पद्धत आहे. जाणून घ्या शहराप्रमाणे चंद्रोदय वेळ व नाना परिमळ दूर्वा ही खास आरती म्हणा.

शुक्ल पक्षात येणारी चतुर्थी विनायक चतुर्थी तर कृष्ण पक्षात येणारी संकष्ट चतुर्थी नावाने ओळखली जाते. २९ जानेवारी सोमवार रोजी, पौष कृष्ण पक्षाची संकष्ट चतुर्थी असून, ही या वर्षाची पहिली चतुर्थी आहे. गणेश संकष्टी चतुर्थी तिथीच्या दिवशी समसप्तक योग, शोभन योग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने संकष्टी चतुर्थी तिथीचे महत्त्वही वाढले आहे.

शहराप्रमाणे चंद्रोदय वेळ

मुंबई - ९ वाजून ३० मिनिटे

ठाणे - ९ वाजून २९ मिनिटे

पुणे - ९ वाजून २६ मिनिटे

रत्नागिरी - ९ वाजून २९ मिनिटे

कोल्हापूर - ९ वाजून २६ मिनिटे

सातारा - ९ वाजून २६ मिनिटे

नाशिक - ९ वाजून २६ मिनिटे

अहमदनगर - ९ वाजून २२ मिनिटे

पणजी - ९ वाजून २८ मिनिटे

धुळे - ९ वाजून २१ मिनिटे

जळगाव - ९ वाजून १८ मिनिटे

वर्धा - ९ वाजून ६ मिनिटे

यवतमाळ - ९ वाजून ८ मिनिटे

बीड - ९ वाजून १८ मिनिटे

सांगली - ९ वाजून २४ मिनिटे

सावंतवाडी - ९ वाजून २८ मिनिटे

सोलापूर - ९ वाजून १८ मिनिटे

नागपूर - ९ वाजून ३ मिनिटे

अमरावती - ८ वाजून ९ मिनिटे

अकोला - ९ वाजून १२ मिनिटे

छत्रपती संभाजी नगर(औरंगाबाद) - ९ वाजून २० मिनिटे

भुसावळ - ९ वाजून १७ मिनिटे

परभणी - ९ वाजून १४ मिनिटे

नांदेड - ९ वाजून ११ मिनिटे

उस्मानाबाद - ९ वाजून १७ मिनिटे

भंडारा - ९ वाजून १ मिनिटे

चंद्रपूर - ९ वाजून ३ मिनिटे

बुलढाणा - ९ वाजून १६ मिनिटे

इंदौर - ९ वाजून १६ मिनिटे

ग्वाल्हेर - ९ वाजून ५ मिनिटे

बेळगाव - ९ वाजून २५ मिनिटे

मालवण - ९ वाजून २९ मिनिटे

गणपतीची आरती नाना परिमळ दूर्वा

नाना परिमळ दूर्वा शेंदूर शमिपत्रें । लाडू मोद्क अन्ने परिपूरित पात्रें ।।

ऐसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे । अष्टहि सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रें ।। १ ।।

जय देव जय देव जय मंगलमूर्ती । तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती ।। ध्रु० ।।

तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती । त्यांची सकलही पापे विघ्नेंही हरती ।।

वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती । सर्वहि पावती अंती भवसागर तरती ।। २ ।।

॥ जय देव जय देव०॥

शरणांगत सर्वस्वें भजती तव चरणी । कीर्ती तयांची राहे जोवर शशितरणि ।।

त्रैलोक्यी ते विजयी अदभूत हे करणी । गोसावीनंदन रत नामस्मरणी ।। ३ ।।

॥ जय देव जय देव०॥

WhatsApp channel