गणेशाच्या केवळ नावाने चैतन्य, उत्साह आणि सकारात्मकतेचा संचार मनात, शरीरात आणि वातावरणात होतो. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षात विनायक चतुर्थी आणि कृष्ण पक्षात संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी भगवान श्री गणेशाची पूजा केली जाते. कारण, देवतांमध्ये श्री गणेशाला प्रथम पूजनीय स्थान दिले जाते.
विघ्न, संकटे, अडथळे दूर करण्यासाठी नेहमी गणपती बाप्पाला प्रार्थना केली जाते. गणेशाच्या चरणी साकळं घालूनच बहुतेक भाविक आपली इच्छापूर्ती करतात. गणपती बाप्पाची पूजा-पाठ करणारा हा खास दिवस म्हणजे नोव्हेंबर महिन्यात येणारी संकष्ट चतुर्थी १८ नोव्हेंबर सोमवार रोजी साजरी करण्यात येत आहे. संकष्ट चतुर्थी ही सर्वांसाठीच खास असते. या संकष्ट चतुर्थी निमित्त प्रियजणांना द्या खास शुभेच्छा.
ॐ गं गणपतये नमो नमः
श्री सिद्धीविनायक नमो नमः
अष्टविनायक नमो नमः
गणपती बाप्पा मोरया
संकष्ट चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा
…
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती,
आरोग्य आपणास लाभो;
ही गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना,
संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा
…
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
संकष्ट चतुर्थी निमित्त शुभेच्छा
…
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ,
निर्विघ्न कुरू मे देव सर्व कार्येशू सर्वदा…
गणपती बाप्पा मोरया,
संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा
…
बाप्पा तुझ्या केवळ असण्यानेच जगायला मिळते बळ
असाच तुझा आशीर्वाद कायम ठरू दे पाठबळ
तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला
संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा
…
फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते,
गणपती बाप्पा मोरया
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
…
रम्य ते रूप सगुण साकार,
मनी दाटे भाव पाहता क्षणभर
अंतरंगी भरूनी येत असे गहिवर,
विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर..
संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!
…
मातापित्याचे आत्मरूप तू
ओंकाराचे पूर्ण रूप तू
कार्यारंभी तुझी अर्चना
विनायका स्वीकार वंदना
संकष्ट चतुर्थीनिमित्त हार्दिक शुभेच्छा
…
एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि,
तन्नो दन्ती प्रचोदयात् …
संकष्टी चतुर्थीच्या मनपूर्वक शुभेच्छा
…