Sankashti Chaturthi Puja : संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पाचे पूजन केले जाते आणि उपवास केला जातो. प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी म्हणतात. कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीचे व्रत १८ नोव्हेंबर रोजी केले जाणार आहे. कार्तिक कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी येते. नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. या दिवशी गणपती आणि चंद्राची पूजा केली जाते.
या दिवशी भाविक उपवास करतात आणि भक्तीभावाने गणेशाची पूजा करतात. प्रत्येक संकष्टी चतुर्थीला स्वतःचे नाव, कथा आणि पार्श्वभूमी असते. असे मानले जाते की श्रीगणेशाची आराधना केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. जो कोणी या दिवशी खऱ्या मनाने व्रत करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात. तसेच, संततीच्या प्राप्तीसाठी आणि संततीच्या दीर्घायुष्यासाठीही माता हे व्रत करतात. चला जाणून घेऊया संकष्टी चतुर्थी पूजेची पद्धत, शुभ मुहूर्त, उपाय, आणि उपवासाची योग्य पद्धत.
चतुर्थी तिथी प्रारंभ - १८ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६:५५ चतुर्थी
तिथी समाप्त - १९ नोव्हेंबर २०२४ संध्याकाळी ५:२८ वाजता
सकाळी लवकर उठून नित्यकर्म करून स्नान झाल्यावस स्वच्छ वस्त्र परिधान करावे. यानंतर देवघर स्वच्छ करून देवपूजा करावी. देवघरातील गणपतीचा जलाभिषेक करा. गणपतीला पिवळे चंदन लावा, फुले, फळे अर्पण करा. प्रसाद म्हणून तिळाचे लाडू किंवा मोदक दाखवा. गणधीप संकष्टी चतुर्थीची कथा वाचा. ॐ गण गणपतये नम: मंत्राचा जप करा. पूर्ण भक्तीभावाने गणपतीची आरती करा. चंद्राचे दर्शन आणि अर्घ्य द्या. क्षमा प्रार्थना करा.
संकष्टी चतुर्थीचा उपवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशीही केवळ सात्विक अन्न किंवा फळेच घ्यावी आणि तामसिक अन्न टाळावे. संकष्टी चतुर्थीमध्ये उपवास साेडण्यासाठी चंद्रदर्शन आणि पूजा आवश्यक मानली जाते. चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर हे व्रत पूर्ण मानले जाते. चंद्रोदयानंतर आपल्या सोयीनुसार अर्घ्य देऊन व्रत करावे आणि आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी पूजा करावी.
उपाय - संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश स्तोत्राचे, मंत्राचे आणि गणेश अथर्वशीर्षाचे पठण करणे शुभ राहील.
चंद्रोदय १८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजून ३४ मिनिटांनी होईल. मात्र, वेगवेगळ्या शहरांमध्ये चंद्रोदयाच्या वेळेत थोडा फरक पडू शकतो.