Sankashti Chaturthi : संकष्ट चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि शहराप्रमाणे चंद्रोदय वेळ
मराठी बातम्या  /  धर्म  /  Sankashti Chaturthi : संकष्ट चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि शहराप्रमाणे चंद्रोदय वेळ

Sankashti Chaturthi : संकष्ट चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि शहराप्रमाणे चंद्रोदय वेळ

Nov 16, 2024 10:53 AM IST

Sankashti Chaturthi November 2024 Date In Marathi : आपल्या इच्छा, मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रथम श्रीगणेशाची आराधना केली जाते. नोव्हेंबर महिन्याची संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि शहराप्रमाणे चंद्रोदय वेळ.

संकष्ट चतुर्थी नोव्हेंबर २०२४
संकष्ट चतुर्थी नोव्हेंबर २०२४

प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी तिथी येतात. शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात तर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी म्हणतात. गौरीपुत्र गजाननाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथी सर्वात शुभ आणि फलदायी मानली जाते. 

नोव्हेंबर महिन्यात येणारी चतुर्थी गणाधिप संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी उपवास करून श्रीगणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते. या वर्षी २०२४ मध्ये नोव्हेंबर महिन्याची संकष्टी चतुर्थी केव्हा आहे, तिथी, पूजा वेळ, महत्त्व आणि शहराप्रमाणे चंद्रोदय वेळ जाणून घेऊया.

संकष्ट चतुर्थी कधी आहे?

सोमवार १८ नोव्हेंबर २०२४ रोजी गणाधिप संकष्टी चतुर्थी आहे. संकष्टी चतुर्थीला व्रत आणि पूजा केल्याने श्रीगणेश प्रसन्न होतात आणि मनोकामना पूर्ण करतात. संकष्टी चतुर्थीच्या नावावरूनच कळू शकते की त्या चतुर्थीचे व्रत पाळल्याने माणसाचे सर्व संकट दूर होतात.

संकष्ट चतुर्थी मुहूर्त

पंचांगानुसार, कार्तीक महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी १८ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी १९ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजून २८ मिनिटांनी समाप्त होईल. 

गणेश पूजेची शुभ वेळ पुढीलप्रमाणे -

सकाळी ९ वाजून २६ मिनिटे ते सकाळी १० वाजून ४६ मिनिटे.

सायंकाळी ५ वाजून २६ मिनिटे ते ७ वाजून ६ मिनिटे.

शहराप्रमाणे चंद्रोदय वेळ

मुंबई - ८ वाजून १६ मिनिटे

ठाणे - ८ वाजून १५ मिनिटे

पुणे - ८ वाजून १३ मिनिटे

रत्नागिरी - ८ वाजून २० मिनिटे

कोल्हापूर - ८ वाजून १७ मिनिटे

सातारा - ८ वाजून १५ मिनिटे

नाशिक - ८ वाजून १० मिनिटे

अहमदनगर - ८ वाजून ८ मिनिटे

पणजी - ८ वाजून २१ मिनिटे

धुळे - ८ वाजून ३ मिनिटे

जळगाव - ८ वाजून ०० मिनिटे

वर्धा - ७ वाजून ४३ मिनिटे

यवतमाळ - ७ वाजून ५१ मिनिटे

बीड - ८ वाजून ४ मिनिटे

सांगली - ८ वाजून १४ मिनिटे

सावंतवाडी - ८ वाजून २० मिनिटे

सोलापूर - ८ वाजून ७ मिनिटे

नागपूर - ७ वाजून ४४ मिनिटे

अमरावती - ७ वाजून ५१ मिनिटे

अकोला - ७ वाजून ५४ मिनिटे

छत्रपती संभाजी नगर(औरंगाबाद) - ८ वाजून ४ मिनिटे

भुसावळ - ७ वाजून ५९ मिनिटे

परभणी - ७ वाजून ५९ मिनिटे

नांदेड - ७ वाजून ५७ मिनिटे

उस्मानाबाद - ८ वाजून ५ मिनिटे

भंडारा - ७ वाजून ४२ मिनिटे

चंद्रपूर - ७ वाजून ४७ मिनिटे

बुलढाणा - ७ वाजून ५८ मिनिटे

इंदौर - ७ वाजून ५४ मिनिटे

ग्वाल्हेर - ७ वाजून ३४ मिनिटे

बेळगाव - ८ वाजून १७ मिनिटे

मालवण - ८ वाजून २१ मिनिटे

Whats_app_banner