गणेश ही विद्येची आणि ऐश्वर्याची देवता आहे आणि सर्व देवतांमध्ये गणेशाची पूजा प्रथम केली जाते. हिंदू कॅलेंडरनुसार दर महिन्याला दोन चतुर्दशी असतात. आज वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे. चतुर्थी तिथीचे व्रत हे गणेशाला समर्पित केले जाते. असे मानले जाते की या दिवशी उपवास करून श्रीगणेशाची पूजा केल्याने मनुष्याला ज्ञान आणि संपत्ती प्राप्त होते. तसेच जीवनात येणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळते.
गणेशाला आद्य पूज्य देवता म्हटले जाते. अशा स्थितीत संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने माणसाला गणेशाची कृपा प्राप्त होते, तसेच हे व्रत केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात.
गणपतीला शेंदूर आणि दुर्वा अर्पण करून २१ लाडवांचा नैवेद्य दाखवावा. यापैकी ५ लाडू गणपती बाप्पाला अर्पण करा आणि उरलेले लाडू गरीब किंवा ब्राह्मणांमध्ये वाटावे. संध्याकाळी गणपतीची पूजा करावी. गणेश चतुर्थीची कथा, गणपती अथर्वशीर्ष आणि आरती केल्यानंतर चंद्राला अर्घ्य द्यावे.
वैशाख महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थी तिथी ०८ मे २०२३ रोजी सायंकाळी ०६ वाजून १९ मिनिटांनी सुरू होत आहे. ही चतुर्थी ०९ मे रोजी सायंकाळी ०४ वाजून ०८ मिनिटांनी संपेल. या दिवशी चंद्रोदयानंतर संध्याकाळी पूजा केली जाते, म्हणून या महिन्याचे संकष्टी चतुर्थी व्रत ०८ मे रोजी पाळले जाईल.
मुंबई, महाराष्ट्र रात्री ०९.५६ वाजता
पुणे, महाराष्ट्र रात्री ०९.५१ वाजता
नागपूर, महाराष्ट्र रात्री ०९.३५ वाजता
नाशिक, महाराष्ट्र रात्री ०९.५५ वाजता
अकोला, महाराष्ट्र रात्री ०९.४३ वाजता