मराठी बातम्या  /  धर्म  /  Sankashti Chaturthi : अंगारक संकष्टी चतुर्थी; वाचा मुहूर्त, पूजा-विधि, मंत्र आणि शहराप्रमाणे चंद्रोदय वेळ

Sankashti Chaturthi : अंगारक संकष्टी चतुर्थी; वाचा मुहूर्त, पूजा-विधि, मंत्र आणि शहराप्रमाणे चंद्रोदय वेळ

Jun 24, 2024 02:36 PM IST

Sankashti Chaturthi June 2024 : संकष्टी चतुर्थी हा श्रीगणेशाचा दिवस मानला जातो आणि या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केली जाते. जाणून घ्या मंगळवार २५ जून रोजी, पडणारी संकष्टी चतुर्थीचे महत्व आणि शहराप्रमाणे चंद्रोदय वेळ.

अंगारक संकष्ट चतुर्थी २५ जून २०२४
अंगारक संकष्ट चतुर्थी २५ जून २०२४

Sankashti Chaturthi June 2024 : यंदा ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत केले जाणार आहे. जून महिन्याची ही चतुर्थी अंगारक संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. श्रीगणेशाची आराधना केल्याने सर्व सुखाची प्राप्ती होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. घरात सुख आणि समृद्धी येते आणि सर्व कार्यात यश प्राप्त होते.

ट्रेंडिंग न्यूज

श्रीगणेशाच्या आशीर्वादाने उत्पन्न, सुख आणि सौभाग्यामध्ये अपार वृद्धी होते. तसेच सर्व प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक त्रासांपासून मुक्ती मिळते. अपत्य प्राप्तीसाठी आणि मुलाच्या दीर्घायुष्यासाठी माता हे व्रत करतात. या चतुर्थीला कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी असेही म्हणतात. जाणून घ्या या संकष्टी चतुर्थीची पूजेची शुभ वेळ, पूजा पद्धत, मंत्र, शहराप्रमाणे चंद्रोदय वेळ आणि श्री संकटनाशनं गणेश स्तोत्र.

संकष्टी चतुर्थी मुहूर्त

मंगळवार २५ जून २०२४ रोजी अर्धरात्रौ १ वाजून २३ मिनिटांनी संकष्टी चतुर्थी प्रारंभ होईल आणि २५ जून रोजी रात्री ११ वाजून ११ मिनिटांनी चतुर्थी तिथी समाप्त होईल. उदया तिथीनुसार २५ जून रोजी संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाईल.

पूजा-विधि

सकाळी स्नानादी कार्य आटोपल्यावर व्रताचा संकल्प करावा. देवपूजा करावी. गणपतीला जलाभिषेक करावा. गणपतीला फुले, फळे अर्पण करा आणि पिवळे चंदन लावा. तिळाचे लाडू किंवा मोदक अर्पण करा. संकष्टी चतुर्थीची कथा वाचा. ॐ गं गणपतये नमः या मंत्राचा जप करा. पूर्ण भक्तीभावाने गणेशाची आरती करा. क्षमा प्रार्थना करा.

शहराप्रमाणे चंद्रोदय वेळ

मुंबई - १० वाजून २८ मिनिटे

ठाणे - १० वाजून २८ मिनिटे

पुणे - १० वाजून २३ मिनिटे

रत्नागिरी - १० वाजून २३ मिनिटे

कोल्हापूर - १० वाजून १९ मिनिटे

सातारा - १० वाजून २२ मिनिटे

नाशिक - १० वाजून २६ मिनिटे

अहमदनगर - १० वाजून २० मिनिटे

पणजी - १० वाजून १९ मिनिटे

धुळे - १० वाजून २३ मिनिटे

जळगाव - १० वाजून २० मिनिटे

वर्धा - १० वाजून ७ मिनिटे

यवतमाळ - १० वाजून ८ मिनिटे

बीड - १० वाजून १६ मिनिटे

सांगली - १० वाजून १८ मिनिटे

सावंतवाडी - १० वाजून २० मिनिटे

सोलापूर - १० वाजून १४ मिनिटे

नागपूर - १० वाजून ५ मिनिटे

अमरावती - १० वाजून ११ मिनिटे

अकोला - १० वाजून १४ मिनिटे

छत्रपती संभाजी नगर(औरंगाबाद) - १० वाजून १९ मिनिटे

भुसावळ - १० वाजून १९ मिनिटे

परभणी - १० वाजून १२ मिनिटे

नांदेड - १० वाजून ९ मिनिटे

उस्मानाबाद - १० वाजून १४ मिनिटे

भंडारा - १० वाजून ३ मिनिटे

चंद्रपूर - १० वाजून ३ मिनिटे

बुलढाणा - १० वाजून १७ मिनिटे

इंदौर - १० वाजून २१ मिनिटे

ग्वाल्हेर - १० वाजून १८ मिनिटे

बेळगाव - १० वाजून १७ मिनिटे

मालवण - १० वाजून २१ मिनिटे

मंत्र- ॐ गणेशाय नमः

श्री संकटनाशनं गणेश स्तोत्र

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।।

भक्तावासं स्मरेन्नित्यमायु:कामार्थसिद्धये ।।१ ।।

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।।

तृतीयं कृष्णपिङ्गगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ।।२ ।।

लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।।

सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ।।३ ।।

नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ।

एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ।।४ ।।

द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर: ।

न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ।।५ ।।

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।

पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ।।६ ।।

जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत् ।

संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: ।।७ ।।

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत् ।

तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ।।८ ।।

इति श्री नारदपुराणे संकटविनाशनं श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम् ।

WhatsApp channel
विभाग