Sankashti Chaturthi February 2025 : प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केली जाते. मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास केल्याने साधकाचे सर्व दु:ख आणि क्लेश दूर होतात. त्याचबरोबर सुख-सौभाग्य आणि संतती प्राप्ती होते. पंचांगानुसार यावर्षी १६ फेब्रुवारी २०२५ रोजी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. हा दिवस गणेशाच्या उपासनेसाठी समर्पित मानला जातो.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची विधिवत पूजा आणि उपवास केल्याने साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुख-समृद्धी येते, असे मानले जाते. जाणून घेऊया गणेशाला प्रसन्न करण्यासाठी संकष्ट चतुर्थी कधी आहे, शुभ मुहूर्त आणि शहराप्रमाणे चंद्रोदय वेळ.
पंचांगानुसार महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी १५ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजून ५२ मिनिटांनी सुरू होऊन १७ फेब्रुवारी रोजी रात्री २ वाजून १५ मिनिटांनी संपते. अशा तऱ्हेने उदयातिथीनुसार १६ फेब्रुवारी २०२५ रोजी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे. यावर्षी द्विजप्रिय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग तयार होत आहे.
मुंबई - ९ वाजून ४९ मिनिटे
ठाणे - ९ वाजून ४८ मिनिटे
पुणे - ९ वाजून ४४ मिनिटे
रत्नागिरी - ९ वाजून ४६ मिनिटे
कोल्हापूर - ९ वाजून ४२ मिनिटे
सातारा - ९ वाजून ४३ मिनिटे
नाशिक - ९ वाजून ४५ मिनिटे
अहमदनगर - ९ वाजून ४१ मिनिटे
पणजी - ९ वाजून ४३ मिनिटे
धुळे - ९ वाजून ४२ मिनिटे
जळगाव - ९ वाजून ३८ मिनिटे
वर्धा - ९ वाजून २६ मिनिटे
यवतमाळ - ९ वाजून २७ मिनिटे
बीड - ९ वाजून ३६ मिनिटे
सांगली - ९ वाजून ४० मिनिटे
सावंतवाडी - ९ वाजून ४३ मिनिटे
सोलापूर - ९ वाजून ३५ मिनिटे
नागपूर - ९ वाजून २४ मिनिटे
अमरावती - ९ वाजून २९ मिनिटे
अकोला - ९ वाजून ३२ मिनिटे
छत्रपती संभाजी नगर(औरंगाबाद) - ९ वाजून ३९ मिनिटे
भुसावळ - ९ वाजून ३८ मिनिटे
परभणी - ९ वाजून ३२ मिनिटे
नांदेड - ९ वाजून ३० मिनिटे
उस्मानाबाद - ९ वाजून ३५ मिनिटे
भंडारा - ९ वाजून २२ मिनिटे
चंद्रपूर - ९ वाजून २२ मिनिटे
बुलढाणा - ९ वाजून ३६ मिनिटे
इंदौर - ९ वाजून ३८ मिनिटे
ग्वाल्हेर - ९ वाजून ३१ मिनिटे
बेळगाव - ९ वाजून ४० मिनिटे
मालवण - ९ वाजून ४४ मिनिटे
संबंधित बातम्या