शुक्ल पक्ष व कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला अनुक्रमे विनायक चतुर्थी व संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते. बुधवार २८ फेब्रुवारी रोजी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थी असून, यादिवशी कोणकोणत्या शुभ योगात हा चतुर्थीचा उपवास केला जाईल? तसेच, संकष्ट चतुर्थीचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत व शहराप्रमाणे चंद्रोदय वेळ पाहूया.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केल्याने तुम्हाला शुभ लाभ मिळतात. या दिवशी काही विशेष वस्तू दान केल्याने तुमचा आनंद वाढतो. बाप्पा तुमच्यावर आलेली सर्व संकटे दूर करतो. श्रीगणेश तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. तुमच्या घरातील सुख-संपत्तीत वाढ होईल आणि तुमचे सौभाग्य वाढेल आणि तुम्हाला गुंतवणूक योजनांमध्ये नफा मिळेल.
पंचांगानुसार, माघ संकष्टी चतुर्थी २८ फेब्रुवारी रोजी पहाटे १ वाजून ५३ मिनिटांनी सुरू होईल. २९ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजून १८ मिनिटांनी संपेल. त्यामुळे उदयातिथीनुसार २८ फेब्रुवारीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाईल आणि २९ फेब्रुवारीला उपवास सोडला जाणार आहे.
गणपती बाप्पाला जलाभिषेक करा, गणपती बाप्पाला फुले, फळ अर्पण करा आणि चंदन लावा. मोदकाचा नैवेद्य दाखवा. संकष्ट चतुर्थी तिथीची कथा वाचा, ॐ गं गणपतये नम: या मंत्राचा जप करा. पूर्ण भक्ती भावाने गणपती बाप्पाची आरती करा. चंद्राचे दर्शन घ्या आणि पाणी अर्पण करा. क्षमा प्रार्थना करा.
मुंबई - ९ वाजून ४९ मिनिटे
ठाणे - ९ वाजून ४८ मिनिटे
पुणे - ९ वाजून ४४ मिनिटे
रत्नागिरी - ९ वाजून ४५ मिनिटे
कोल्हापूर - ९ वाजून ४१ मिनिटे
सातारा - ९ वाजून ४३ मिनिटे
नाशिक - ९ वाजून ४६ मिनिटे
अहमदनगर - ९ वाजून ४१ मिनिटे
पणजी - ९ वाजून ४२ मिनिटे
धुळे - ९ वाजून ४२ मिनिटे
जळगाव - ९ वाजून ३९ मिनिटे
वर्धा - ९ वाजून २६ मिनिटे
यवतमाळ - ९ वाजून २८ मिनिटे
बीड - ९ वाजून ३७ मिनिटे
सांगली - ९ वाजून ४० मिनिटे
सावंतवाडी - ९ वाजून ४२ मिनिटे
सोलापूर - ९ वाजून ३५ मिनिटे
नागपूर - ९ वाजून २४ मिनिटे
अमरावती - ८ वाजून ३० मिनिटे
अकोला - ९ वाजून ३३ मिनिटे
छत्रपती संभाजी नगर(औरंगाबाद) - ९ वाजून ३९ मिनिटे
भुसावळ - ९ वाजून ३८ मिनिटे
परभणी - ९ वाजून ३३ मिनिटे
नांदेड - ९ वाजून ३० मिनिटे
उस्मानाबाद - ९ वाजून ३५ मिनिटे
भंडारा - ९ वाजून २२ मिनिटे
चंद्रपूर - ९ वाजून २३ मिनिटे
बुलढाणा - ९ वाजून ३६ मिनिटे
इंदौर - ९ वाजून ३९ मिनिटे
ग्वाल्हेर - ९ वाजून ३३ मिनिटे
बेळगाव - ९ वाजून ३९ मिनिटे
मालवण - ९ वाजून ४४ मिनिटे