Sankashti Chaturthi:संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाला या पदार्थांचा लावा भोग, सर्व विघ्ने होतील दूर, असे होतील फायदे!
मराठी बातम्या  /  धर्म  /  Sankashti Chaturthi:संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाला या पदार्थांचा लावा भोग, सर्व विघ्ने होतील दूर, असे होतील फायदे!

Sankashti Chaturthi:संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाला या पदार्थांचा लावा भोग, सर्व विघ्ने होतील दूर, असे होतील फायदे!

Nov 16, 2024 05:57 PM IST

Sankashti Chaturthi: प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षाची चतुर्थी श्रीगणेशाला समर्पित आहे. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा करण्याची परंपरा आहे. तसेच श्रीगणेशाला प्रिय असलेल्या पदार्थांचा भोग श्रीगणेशाला दाखवला जातो.

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाला या पदार्थांचा लावा भोग, सर्व विघ्ने होतील दूर, असे होतील फायदे!
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाला या पदार्थांचा लावा भोग, सर्व विघ्ने होतील दूर, असे होतील फायदे!

Sankashti Chaturthi Marathi News:  दर महिन्यातील शुक्ल आणि कृष्ण पक्षातील चतुर्थीला श्रीगणेशाची पूजाअर्चा केली जाते. चतुर्थी तिथीला श्रीगणेशाची विधिवत पूजा केल्यास व्यक्तीची सर्व संकटे दूर होतात. तसेच घरात सुख-समृद्धी नांदते. ही विधिवत पूजा करत असताना श्रीगणेशाला प्रिय असलेल्या पदार्थांचा भोग लावला जातो. असे मानले जाते की असे भोग अर्पण केल्याने व्यक्तीला पूजेचे पूर्ण फळ मिळते. तसेच सर्व कामात यश मिळते. पाहू या श्रीगणेशाला कोणत्या पदार्थांचे भोग लावणे योग्य ठरेल आणि गणपती देवता प्रसन्न होईल.

श्रीगणेशाला मोदक प्रिय

गजाननाला मोदक फार प्रिय आहेत हे सर्वांनाच ठाऊक आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला मोदक अर्पण करा. असे मानले जाते की मोदक अर्पण केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. मोदक अर्पण केल्यानंतर व्यक्तीलाही मोठे समाधान मिळते तसेच पूजाही परिपूर्ण होते.

तुमच्या मनाप्रमाणे करिअर मिळेल

गणाधिप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाला मोदक अर्पण करतानाच पूजा थाळीमध्ये श्रीखंड, छप्पन भोग, शुद्ध तूप आणि गूळ इत्यादींचा समावेश करावा. असे मानले जाते की या वस्तू अर्पण केल्याने व्यक्तीला इच्छित व्यवसाय, करिअर किंवा नोकरी प्राप्त होते. याशिवाय आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही, अशी धार्मिक मान्यता आहे.

घट्ट होते पती-पत्नीचे नाते

दाम्पत्याचे वैवाहिक जीवन सुखी ठेवण्यासाठी गणाधिप संकष्टी चतुर्थीचा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी श्रीगणेशाची पूजा करताना त्यांना मोतीचूर लाडू अर्पण करावेत. यामुळे वैवाहिक जीवनात आनंद मिळतो आणि पती-पत्नीचे नाते घट्ट होते, अशी मान्यता आहे.

१८ नोव्हेंबर रोजी पाळा गणाधिप संकष्टी चतुर्थीचे व्रत

कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ( म्हणजेच १८ नोव्हेंबर रोजी) संध्याकाळी ०६ वाजून ५५ मिनिटांनी सुरू होत आहे. तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच १९ नोव्हेंबरला संध्याकाळी ०५ वाजून २८ मिनिटांनी संपेल. अशा स्थितीत १८ नोव्हेंबर रोजी गणाधिप संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळण्यात येणार आहे. या दिवशी संध्याकाळी चंद्राला अर्घ्य दिले जाते. चंद्रोदय संध्याकाळी ०७ वाजून ३४ मिनिटांनी होणार आहे.

Didclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner