संकष्टी चतुर्थी हे गणपतीला समर्पित व्रत आहे. असे मानले जाते की, या दिवशी श्रीगणेशाची पूजा केल्याने सर्व दु:ख आणि समस्या दूर होतात आणि जीवनात सुख-समृद्धी येते. प्रत्येक महिन्यातील चतुर्थीला हे व्रत करण्यात येते. शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात तर कृष्ण पक्षाक येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी म्हणतात.
या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी बुधवार १८ डिसेंबर रोजी येत आहे. पंचांगानुसार, मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी तिथी बुधवार १८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजून ६ मिनिटांनी सुरू होईल आणि गुरुवार १९ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजून २ मिनिटांनी समाप्त होईल. गणपती बाप्पाची पूजा-पाठ करणारा हा खास दिवस प्रत्येक जण सोशल मीडियावरही एकमेकांना शुभेच्छा देऊन साजरा करतात. तेव्हा तुम्हीही या वर्षाची शेवटची संकष्ट चतुर्थी प्रियजणांना शुभेच्छा पाठवून गोड करा.
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची
नूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची
संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
…
विघ्न विनाशक गुणीजन पालक, दुरीततिमीर हारका...ऽऽऽ
सुखकारक तू दु:ख विदारक, तुच तुझ्या सारखा
वक्रतुंड ब्रम्हांडनायका, विनायका प्रभुराया
प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया…
संकष्ट चतुर्थीच्या मन:पूर्वक शुभेच्छा
…
भक्ति गणपती,
शक्ति गणपती
सिद्धी गणपती,
लक्ष्मी गणपती
महागणपती..
संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!
…
सकाळ हसरी असावी,
बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी
मुखी असावे बाप्पाचे नाम,
सोपे होईल सर्व काम
संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा
…
ॐ वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटि समप्रभ:।
निर्विघ्नं कुरू मे देव, सर्व कार्येषु सर्वदा।।
वर्षातील शेवटच्या संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
…
वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला,
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी सर्व गणेशभक्तांना,
संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!
…
संकटांवर मात करणारा गणपती
तुम्हाला यश देवो,
तुमच्या आयुष्यात आनंद आणो
आणि दुःख दूर करो..
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!
…
कितीही मोठी समस्या असू दे,
देवा तुझ्या नावातच समाधान आहे..
संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!
…
मच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…"
संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा
…
ॐ गं गणपतये नमो नमः
श्री सिद्धीविनायक नमो नमः
अष्टविनायक नमो नमः
गणपती बाप्पा मोरया."
संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा.