Sankashti Chaturthi Puja Vidhi And Chandrodaya Time In Marathi : संकष्टी चतुर्थीचे व्रत महिन्यातून एकदा केले जाते, जे भगवान श्री गणेशाला समर्पित असते. मार्गशीर्ष महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पाची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. अनेक जण या दिवशी गणपतीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी व्रतही करतात, जे चंद्राचे दर्शन घेतल्यानंतरच केले जाते. चला जाणून घेऊया डिसेंबर महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीची नेमकी तारीख, मुहूर्त, पूजेची पद्धत आणि शहराप्रमाणे चंद्रोदय वेळ.
पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाची संकष्टी चतुर्थी तिथी १८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजून ६ मिनिटांनी सुरू होईल. संकष्टी चतुर्थी तिथी १९ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजून २ मिनिटांनी संपणार आहे. संध्याकाळी संकष्टी चतुर्थीची पूजा केली जाते. त्यामुळे डिसेंबरच्या संकष्टी चतुर्थीचे व्रत १८ डिसेंबर रोजी ठेवण्यात येणार आहे.
सकाळी लवकर उठून स्नानादी कार्य पूर्ण झाल्यावर स्वच्छ कपडे परिधान करा. यानंतर देवघराची स्वच्छता करून देवपूजा करा. गणपती बाप्पाला जलाभिषेक करा. गणपतीला फुले, फळे आणि पिवळे चंदन अर्पण करा. तीळ किंवा बुंदीचे लाडू अर्पण करा. संकष्टी चतुर्थी कथा वाचा. ॐ गणपत्ये नमः या मंत्राचा जप करा. पूर्ण भक्तीभावाने गणपतीची आरती करा. नैवेद्य अर्पण करा. शेवटी क्षमा प्रार्थना करा.
गणपती बाप्पाला दूर्वा फार प्रिय आहे. त्यामुळे गणपतीचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी बाप्पाला दूर्वा अर्पण करा.
मुंबई - ९ वाजून ३ मिनिटे
ठाणे - ९ वाजून २ मिनिटे
पुणे - ८ वाजून ५९ मिनिटे
रत्नागिरी - ९ वाजून ४ मिनिटे
कोल्हापूर - ९ वाजून १ मिनिटे
सातारा - ९ वाजून ०० मिनिटे
नाशिक - ८ वाजून ५७ मिनिटे
अहमदनगर - ८ वाजून ५४ मिनिटे
पणजी - ९ वाजून ५ मिनिटे
धुळे - ८ वाजून ५१ मिनिटे
जळगाव - ८ वाजून ४७ मिनिटे
वर्धा - ८ वाजून ३५ मिनिटे
यवतमाळ - ८ वाजून ३८ मिनिटे
बीड - ८ वाजून ५० मिनिटे
सांगली - ८ वाजून ५९ मिनिटे
सावंतवाडी - ९ वाजून ४ मिनिटे
सोलापूर - ८ वाजून ५२ मिनिटे
नागपूर - ८ वाजून ३२ मिनिटे
अमरावती - ८ वाजून ३८ मिनिटे
अकोला - ८ वाजून ४२ मिनिटे
छत्रपती संभाजी नगर(औरंगाबाद) - ८ वाजून ५० मिनिटे
भुसावळ - ८ वाजून ४६ मिनिटे
परभणी - ८ वाजून ४६ मिनिटे
नांदेड - ८ वाजून ४३ मिनिटे
उस्मानाबाद - ८ वाजून ५१ मिनिटे
भंडारा - ८ वाजून ३० मिनिटे
चंद्रपूर - ८ वाजून ३४ मिनिटे
बुलढाणा - ८ वाजून ४६ मिनिटे
इंदौर - ८ वाजून ४२ मिनिटे
ग्वाल्हेर - ८ वाजून २६ मिनिटे
बेळगाव - ९ वाजून २ मिनिटे
मालवण - ९ वाजून ६ मिनिटे
डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.
संबंधित बातम्या