Sankashti Chaturthi : चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी; वाचा शहराप्रमाणे चंद्रोदय वेळ, शुभ मुहूर्त आणि पूजाविधी
मराठी बातम्या  /  धर्म  /  Sankashti Chaturthi : चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी; वाचा शहराप्रमाणे चंद्रोदय वेळ, शुभ मुहूर्त आणि पूजाविधी

Sankashti Chaturthi : चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी; वाचा शहराप्रमाणे चंद्रोदय वेळ, शुभ मुहूर्त आणि पूजाविधी

Published Jul 24, 2024 08:41 AM IST

Sankashti Chaturthi July 2024 : जुलै महिन्याची ही चतुर्थी गजानन संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. अपत्यप्राप्तीसाठी आणि मुलाच्या दीर्घायुष्यासाठी माता हे व्रत करतात.

संकष्ट चतुर्थी जुलै २०२४
संकष्ट चतुर्थी जुलै २०२४

Sankashti Chaturthi : यंदा आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाणार आहे. जुलै महिन्याची आणि चातुर्मासातील ही पहिली चतुर्थी गजानन संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जात आहे. अपत्यप्राप्तीसाठी आणि मुलाच्या दीर्घायुष्यासाठी माता हे व्रत करतात. या दिवशी गणेश आणि चंद्र देवाची पूजा केली जाते. जाणून घेऊया गजानन संकष्टी चतुर्थी पूजेचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, मंत्र, चंद्रोदय वेळ आणि श्रीगणेशाची आरती-

गजानन चतुर्थी शुभ मुहूर्त

चतुर्थी तिथी प्रारंभ - २४ जुलै २०२४ रोजी सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सुरु होणार आहे.

चतुर्थी तिथी समाप्त - २५ जुलै रोजी पहाटे ४ वाजून १९ मिनिटांनी चतुर्थी समाप्त होईल.

गजानन संकष्टी चतुर्थी पूजा पद्धत

लवकर उठून देवघर स्वच्छ करा, देवपूजा करा. श्रीगणेशाचा जलाभिषेक करावा. गणपतीला फुले, फळे अर्पण करा आणि पिवळे चंदन लावा. तिळाचे लाडू किंवा मोदक अर्पण करा, गजानन संकष्टी चतुर्थीची कथा वाचा, ॐ गं गणपतये नमः या मंत्राचा जप करा, पूर्ण भक्तीभावाने गणेशाची आरती करा. क्षमा प्रार्थना करा.

शहराप्रमाणे चंद्रोदय वेळ

मुंबई - ९ वाजून ४८ मिनिटे

ठाणे - ९ वाजून ४८ मिनिटे

पुणे - ९ वाजून ४४ मिनिटे

रत्नागिरी - ९ वाजून ४५ मिनिटे

कोल्हापूर - ९ वाजून ४१ मिनिटे

सातारा - ९ वाजून ४३ मिनिटे

नाशिक - ९ वाजून ४५ मिनिटे

अहमदनगर - ९ वाजून ४० मिनिटे

पणजी - ९ वाजून ४२ मिनिटे

धुळे - ९ वाजून ४१ मिनिटे

जळगाव - ९ वाजून ३८मिनिटे

वर्धा - ९ वाजून २५ मिनिटे

यवतमाळ - ९ वाजून २७ मिनिटे

बीड - ९ वाजून ३६ मिनिटे

सांगली - ९ वाजून ४० मिनिटे

सावंतवाडी - ९ वाजून ४२ मिनिटे

सोलापूर - ९ वाजून ३५ मिनिटे

नागपूर - ९ वाजून २३ मिनिटे

अमरावती - ९ वाजून २९ मिनिटे

अकोला - ९ वाजून ३२ मिनिटे

छत्रपती संभाजी नगर(औरंगाबाद) - ९ वाजून ३८ मिनिटे

भुसावळ - ९ वाजून ३७ मिनिटे

परभणी - ९ वाजून ३२ मिनिटे

नांदेड - ९ वाजून २९ मिनिटे

उस्मानाबाद - ९ वाजून ३४ मिनिटे

भंडारा - ९ वाजून २१ मिनिटे

चंद्रपूर - ९ वाजून २२ मिनिटे

बुलढाणा - ९ वाजून ३५ मिनिटे

इंदौर - ९ वाजून ३८ मिनिटे

ग्वाल्हेर - ९ वाजून ३१ मिनिटे

बेळगाव - ९ वाजून ४० मिनिटे

मालवण - ९ वाजून ४४ मिनिटे

Whats_app_banner