sankashti chaturthi 2024 : हिंदू कँलेंडरनुसार दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. यावेळी संकष्टी चतुर्थीचे व्रत सोमवारी (२९ जानेवारी) पाळण्यात येणार आहे. या विशेष प्रसंगी स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी उपवास करतात. या तिथीला तिल चतुर्थी किंवा माघी चतुर्थी असेही म्हणतात.
माघ महिन्यात पाळल्या जाणाऱ्या व्रतांपैकी हा सर्वात महत्त्वाचा व्रत मानला जातो. या व्रताबद्दल लोकांची धार्मिक श्रद्धाही आहे. दरम्यान, संकष्टी चतुर्थीचा उपवास का आणि कोणासाठी केला जातो, हे या ठिकाणी जाणून घेणार आहोत. सोबतच हिंदू पूजा पद्धतीनुसार हे व्रत पाळण्याचे नियम देखील सांगणार आहोत.
हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीच्या उपवासाचे विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाने माता पार्वती आणि भगवान शिव यांच्याभोवती प्रदक्षिणा घातली होती. माता-पित्यांची प्रदक्षिणा करून, ते म्हणाले होते की हे संपूर्ण विश्वाची परिक्रमा करण्यासारखे आहे. त्यामुळे त्या दिवसापासून ते पूजनीय झाले. माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि समृद्ध आयुष्यासाठी हे व्रत करतात.
सोबतच नवविवाहित जोडपीदेखील आपल्या मुलांच्या सुखासाठी या दिवशी उपवास करतात. या व्रताबद्दल अशी समजूत आहे की या दिवशी उपवास केल्याने रिकामी गोद भरते. या दिवशी गणपतीची आराधना केल्याने त्याचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात संततीप्राप्तीचे सुख प्राप्त होते.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उशिरा झोपून नये आणि उशिरा उठू नये. या दिवशी सकाळी लकवर उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करून उपवास सुरू करा.
या दिवशी शुभ फळ मिळण्यासाठी गणपती, माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या मूर्ती पूजागृहात स्थापित कराव्यात. तसेच त्यांची यथायोग्य पूजा करावी.
देवाची मूर्ती स्थापित केल्यानंतर त्याला गंगाजलाने स्नान घालावे, फळे, फुले, नैवेद्य, हार, अगरबत्ती इत्यादी अर्पण करावे.
पूजेचे साहित्य अर्पण केल्यानंतर गजाननाची आरती करून या दिवशी त्यांना तिलक अर्पण करावे.
संकष्टी चतुर्थीला दिवसभर उपवास केल्यानंतर उपवास करणाऱ्या माता तसेच, मूल होऊ इच्छिणाऱ्या नवविवाहितांनी सायंकाळी चंद्रदेवाचे दर्शन घेऊन मुहूर्तानुसार उपवास सोडावा.
या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी काळे कपडे घालू नयेत. कोणत्याही शुभ पूजेच्या वेळी काळा रंग परिधान करणे अशुभ मानले जाते. हे व्रत पाण्याशिवाय पाळले जाते, उपवासात अन्न आणि पाणी सेवन करू नये.
संबंधित बातम्या